हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील महिलांसाठी (Mukhyamantri Annapurna Yojana) आता आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर केली असून या योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत (Free Gas Cylinder) मिळणार आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (Pradhanmantri Ujjwala Yojana) लाभ घेणाऱ्या सुमारे 52 लाख 16 हजार महिलांसह, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे (Mukhyamantri Annapurna Yojana) महिलांना घरातल्या स्वयंपाकाचा खर्च कमी करण्यास मदत होणार आहे.
‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेची वैशिष्ट्ये (Mukhyamantri Annapurna Yojana)
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलिंडर मोफत मिळतील.
- एका कुटुंबातून एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार.
- एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलिंडर मिळणार नाही.
- सिलिंडरचे वजन 14.2 किलोग्रॅम असणे आवश्यक.
- उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत (Mukhyamantri Annapurna Yojana) राज्य सरकार महिलांच्या खात्यात 530 रुपये जमा करेल.
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलिंडर 830 रुपये जमा होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज आले असून, अंदाजे पावणे तीन कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी होण्याची शक्यता आहे.
या योजनेची (Mukhyamantri Annapurna Yojana) माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन मोहीम राबवणार आहे. विशेषतः बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक नसलेल्या महिलांना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेमुळे (Mukhyamantri Annapurna Yojana) ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपाकाचा खर्च कमी झाल्याने महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाणार आहे.