Battery Operated Sprayer Pump Yojana: शेतकऱ्यांनो, बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पीक संरक्षणात फवारणी पंपाला (Battery Operated Sprayer Pump Yojana)  मोठ्या प्रमाणात मागणी असते. शेतकर्‍यांची (Maharashtra Farmers) ही गरज लक्षात घेता महाराष्ट्र सरकारतर्फे (Maharashtra Government) शेतातील पीक फवारणीसाठी लागणारा फवारणी पंप जवळजवळ 50 टक्के अनुदानावर देण्याची योजना (Battery Operated Sprayer Pump Yojana) राबवली जात आहे.

शासनाच्या वतीने शेतकर्‍यांना अनुदानावर फवारणी पंप (Subsidy On Spraying Pump)  उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी अर्ज (Online Application) मागविण्यात येतात. राज्य सरकार कृषी यंत्र योजने अंतर्गत शेतकर्‍यांना अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज मागवतात. यामध्ये अर्ज करून शेतकरी बांधव फवारणी यंत्रासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. या योजनेसाठी अर्ज (Battery Operated Sprayer Pump Yojana) कसा करायचा जाणून घेऊ या सविस्तर.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Battery Operated Sprayer Pump Yojana Online Application)

  • अर्ज भरणाऱ्या शेतकर्‍याचे आधार कार्ड
  • अर्जदार शेतकर्‍याचे रहिवासी प्रमाणपत्र
  • शेतकर्‍याचे बँक तपशील म्हणजे बँक पासबुकची प्रत
  • अर्जदार शेतकर्‍याचे जात प्रमाणपत्र. (SC, ST, साठी लागू असल्यास)
  • अर्जदाराचे मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणारा.

बॅटरी स्वयंचलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? (Battery Operated Sprayer Pump Yojana)

  • https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करा.
  • अर्ज करा वर क्लिक करा. नंतर नवीन पेज ओपन होईल.
  • कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा वर क्लिक करा.
  • मुख्य घटक निवडा व कृषी यंत्र अवजराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य प्रकार निवडा
  • नंतर तपशील निवडा मध्ये मनुष्यचलीत औजारे हा प्रकार निवडा.
  • यंत्रसामग्री अवजारे व उपकरणे यावर क्लिक करा. नंतर पीक संरक्षण अवजारे निवडा.
  • नंतर खाली मशीनचा प्रकार यामध्ये बरेचसे पंपांचे प्रकार दिलेले आहेत त्यापैकी एक पंप निवडा.
  • व नंतर नियम अटीवर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा व नंतर चलन भरा.