Mahamesh Yojana: महामेष योजनेत बदल; मेंढपाळ लाभार्थीं रक्कम थेट खात्यात जमा होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Mahamesh Yojana) राज्यातील मेंढपाळांसाठी पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय दि. 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

सन 2017-18 च्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री यांनी योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढविण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल, असे घोषित केले होते. सदर योजनेत महामंडळाकडे सध्यास्थितीत प्रलंबित/प्रतिक्षाधिन अर्ज व महामंडळाकडे उपलब्ध असलेला निधी विचारात घेवून ही योजना (Mahamesh Yojana) पुढे चालु ठेवण्यास मा. मंत्रिमंडळाने दिनांक 23 जुलै 2024 रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार शासन निर्णय (Mahamesh Yojana GR) जारी करण्यात आला आहे.

राज्यातील धनगर समाजातील (Dhanagar Samaj) मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना (Mahamesh Yojana) 2017 वर्षापासून सुरु होती. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली. या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29 कोटी 55 लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्याबाबतीत 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रीयेतून (DBT) लाभार्थीना देण्यात येईल. तसेच चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत झालेले बदल  

  • धनगर व तत्सम समाजास सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी शासन निर्णय अन्वये लागू करण्यात आलेली “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना – (Mahamesh Yojana) यापूढे चालू ठेवण्यात येत आहे.
  • ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडे (Maharashtra Sheep and Goat Development Corporation) अखर्चित असलेला रु. 29.55 कोटी इतका निधी चालु वित्तीय वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच पुढील वर्षापासून उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
  • या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रतिसाद विचारात घेऊन लाभार्थी उद्दिष्टे तसेच आर्थिक उद्दिष्टे यामध्ये अंतर्गत बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आले आहे.
  • सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारे पशुधन (मेंढ्या व नर) यांची लाभार्थ्यांने प्रथम स्वखर्चातून महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन अथवा जनावरांच्या अधिकृत बाजारातून खालील समितीच्या उपस्थितीत खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (संबंधित जिल्हा)
  • पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती
  • पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना
  • विमा
  • लाभधारक
  • संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी खरेदी करण्यात आलेल्या पशुधन खरेदीच्या मुळ पावत्या तसेच खरेदी केलेले पशुधन व खरेदी समितीच्या एकत्रित फोटोसह खरेदी अहवाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना सादर कराव्यात.
  • व्यवस्थापकीय संचालक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांना कागदपत्रे सादर केल्यानंतर 75 टक्के अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
  • सदर योजनेंतर्गत (Mahamesh Yojana) लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड, पुणे यांच्या प्रक्षेत्रावरुन देण्यात येणा-या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे/बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बाबींचे लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या (DBT) माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येईल.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.