Nar-Par-Girna River Linking Project: नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला मंजूरी; देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला (Nar-Par-Girna River Linking Project) राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मंजूरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

नार-पार-गिरणा नदी (Nar-Par-Girna River Linking Project) खोर्‍यातून 10.64 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. यामुळे तब्बल 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे. नाशिक (Nashik District) आणि जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) शेतकऱ्यांना  (Farmers) यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  

ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की “वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजूरी दिली आहे. मी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे 7015 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या (Water Abundance) दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे”.

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प नक्की आहे तरी काय?

नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची (Divert Of Surplus Water From River) ही योजना आहे. यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारणता अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा (Nar-Par-Girna River Linking Project) या नदीखोऱ्यातून 10.64 TMC पाणीवापर प्रस्तावित आहे. आता या योजनेला मंजूर मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.