Fund For Dairy Farmers: विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी 149 कोटी (Fund For Dairy Farmers) रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) शेतकरी, शिक्षक, नागरिक आणि उद्योजकांना लाभ देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयांमध्ये दूध उत्पादकांसाठी (Dairy Farmers) सर्वात उल्लेखनीय निर्णय (Fund For Dairy Farmers) राज्य सरकारने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाने  विदर्भ आणि मराठवाडा भागातील दुग्धव्यवसायाला (Dairy Business) चालना मिळणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादक (Vidarbha & Marathwada Dairy Farmers) गेल्या काही वर्षांपासून संकटात होते. या निर्णयामुळे (Fund For Dairy Farmers) या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

इतर महत्वाचे निर्णय (Other Cabinet Meeting Decision)

  • शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच, यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथील करण्यात आली आहे.
  • शिक्षण क्षेत्रासाठीच्या निर्णयामध्ये डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांचे आरोग्य सुरक्षित राहील.
  • राज्य सरकारने सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील रस्ते अधिक टिकाऊ होतील. तसेच, नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यामुळे नगरपालिकांना दीर्घकालीन (Long term) नियोजन करण्यास मदत होईल.
  • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना मिळेल आणि राज्यात स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन वाढेल.
  • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे लाखो नागरिकांना लाभ होणार आहे.

येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणूक असल्याने आता होणारी मंत्रिमंडळाची प्रत्येक बैठक ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने विविध क्षेत्रासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे.