Dairy Animal Nutrition: तुमची गाय, म्हैस गाभण राहत नाही का? खाऊ घाला ‘हा’ पौष्टिक लाडू!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गाय, म्हैस यांच्या गर्भधारणासाठी पौष्टिक आहार (Dairy Animal Nutrition) महत्त्वाचा असतो. अनेक पशुपालक (Dairy Farmers) शेतकरी गाय, म्हैस गाभण राहत नसल्याची तक्रार करतात. परंतु बहुतेक पशुपालकांना जनावर गाभण राहण्यासाठी (Dairy Animal Pregnancy) कोणता आहार (Dairy Animal Nutrition) खाऊ घालावा याबद्दल माहिती नसते.

परंतु पशुपालकांच्या या समस्येवर उपाय शोधण्यात आलेला आहे.  

भारतीय प्राणी संशोधन संस्थेने (IVRI) गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये जनावरांसाठी पोषक लाडू (Poshak Laddu) तयार केलेत. या लाडू मध्ये शास्त्रज्ञांनी असे काही पोषक घटक (Dairy Animal Nutrition) टाकले आहेत, ज्यामुळे गाय असो किंवा म्हैस त्यांची गर्भधारणेची क्षमता सुधारते (Improving Fertility).

तसेच शास्त्रज्ञांनी हा लाडू पूर्णपणे आयुर्वेदिक असल्याचे म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, मोलॅसिस, कोंडा, नॉन-प्रोटीन नायट्रोजन, खनिज मिश्रण आणि मीठ या पदार्थांच्या मिश्रणातून हा पौष्टिक लाडू जनावरांसाठी तयार करण्यात आला आहे (Dairy Animal Nutrition).

हा 250 ग्रॅम चा एक लाडू बनवण्यासाठी फक्त 20 रुपयांचा खर्च येतो हे विशेष. जर पशुपालकांना हा लाडू बनवायचा असेल तर ते भारतीय प्राणी संशोधन संस्थेकडून याची ट्रेनिंग घेऊ शकतात.

जर गाय किंवा म्हैस गाभण राहत नसेल तर अशा जनावरांना हा लाडू सलग 20 दिवस खाऊ घातल्यास गर्भधारणेची समस्या समूळ नष्ट होऊ शकते. अवघ्या एका महिन्याच्या काळातच या लाडूमुळे शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळणार आहेत.

या लाडूमुळे गाय, म्हैस गाभण तर राहणारच आहे. शिवाय यामुळे दुग्ध उत्पादनक्षमता देखील वाढत असल्याचा दावा या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी यावेळी केला आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.