हॅलो कृषी ऑनलाईन: दूध देणार्या जनावरांच्या शरीरावर येणार्या किडींचा (Pest Control In Dairy Industry) प्रादुर्भाव हा शेतकर्यांसाठी एक गंभीर समस्या बनला आहे. किडीमुळे जनावरांना होणार्या त्रासामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे दुधाच्या उत्पादनात (Effect Of Pest On Milk Production) लक्षणीय घट होते. ही समस्या केवळ आर्थिकदृष्ट्या नुकसानकारकच नाही तर जनावरांच्या निरोगी (Dairy Animal Health) जीवनावरही गंभीर परिणाम घडवते.
दुधाळ जनावरांच्या स्वास्थ्यावर आघात करणारे कीटक (Animal Pest) म्हणजे गोचीड (Ticks) टिक्स, माइट्स, उवा, माश्या, आणि पिसवा यांसारख्या कीटकांनी जनावरांच्या शरीरावर आक्रमण केल्याने त्यांचे जीवन तणावग्रस्त बनते, आणि परिणामी शेतकर्यांच्या उपजीविकेवर मोठा आघात होतो.
दुधाळ जनावरांचे (Milking Animals) आरोग्य आणि दुधाचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी जनावरांच्या शरीरावर येणार्या किडींचे प्रभावी नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किडींचा प्रादुर्भाव जनावरांना त्रास देतो, रोगांचे प्रसार करतो आणि शेवटी दुधाच्या उत्पादनात घट होते. यामुळे किडींचे योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रण गरजेचे आहे. या लेखात आपण काही सामान्य किडी, त्यांच्या दुष्परिणामाबद्दल, आणि त्यांच्या नियंत्रणासाठी (Pest Control In Dairy Industry) विविध पद्धतींचा सखोल आढावा घेऊ.
गोचीड (Ticks)
गोचीडमुळे जनावरांमध्ये बाबेशिओसिस आणि अनाप्लास्मोसिस सारखे गंभीर रोग पसरू शकतात. या रोगांमुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, ताप येतो, रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होते आणि अशक्तपणा येतो.
व्यवस्थापन (Pest Control In Dairy Industry)
- रासायनिक नियंत्रण: अकारिसाइड्सचा वापर करून टिक्स नियंत्रण केले जाते. हे रसायन विविध स्वरुपात उपलब्ध असतात, जसे की डिप्स, स्प्रे, किंवा पोर-ऑन. या रसायनांचा योग्य वापर करून टिक्सच्या वाढीला आळा घालता येतो.
- जैविक नियंत्रण: टिक्सच्या नैसर्गिक शत्रूंना प्रोत्साहन देऊन त्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. जसे की पक्षी, जे टिक्स खाऊन त्यांची संख्या कमी करतात. तसेच, काही बुरशी टिक्सवर परिणामकारक आहेत.
- पर्यावरणीय नियंत्रण: चराऊ क्षेत्रांची नियमित साफसफाई आणि व्यवस्थित व्यवस्थापन केल्याने टिक्सच्या निवास स्थानांवर नियंत्रण ठेवता येते. चराई क्षेत्रे बदलत राहणे हे टिक्सच्या जीवनचक्राला खंडित करण्यासाठी महत्त्वाचे आहे (Pest Control In Dairy Industry) .
माइट्स (Mites)
माइट्समुळे त्वचेची खाज, जळजळ, आणि जखम होण्याची शक्यता असते. जनावरांमध्ये या समस्येमुळे उत्पादन क्षमता कमी होऊ शकते आणि त्यांची शारीरिक स्थिती खालावू शकते.
व्यवस्थापन (Pest Control In Dairy Industry)
- रासायनिक नियंत्रण: माइट्स नियंत्रणासाठी विशिष्ट रसायनांचा वापर करावा, जसे की माइटीसाइड्स, जे स्प्रे, डिप्स किंवा टॉपिकल उपचारांच्या स्वरुपात वापरले जातात.
- स्वच्छता: जनावरांच्या निवास स्थानांची नियमित साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करून माइट्सच्या प्रसाराला आळा घालता येतो.
- विलगीकरण: संक्रमित जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवल्याने माइट्सचा प्रसार थांबवता येतो.
ऊवा/ जूं (Lice)
जूंमुळे जनावरांमध्ये खाज, त्वचेची हानी आणि रक्ताल्पता (अॅनिमिया) होऊ शकते. खाजेमुळे जनावरांची एकाग्रता कमी होते, ज्यामुळे त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो.
- रासायनिक नियंत्रण: जूं नियंत्रणासाठी (Pest Control In Dairy Industry) कीटकनाशक पावडर, स्प्रे किंवा पोर-ऑनचा वापर करावा. या उपायांनी जूंचा नाश होतो आणि त्यांच्या पुनरावृत्तीला आळा बसतो.
- स्वच्छता: जनावरांची नियमित निगा राखणे, स्वच्छता करणे, आणि नियमितपणे त्यांची तपासणी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जनावरांच्या केसांचा योग्य प्रकारे धुवून स्वच्छता राखल्याने जूंमुळे होणारा त्रास कमी होतो.
- विलगीकरण: प्रभावित जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवल्याने या कीटकांचा प्रसार रोखता येतो.
माश्या (Flies)
माश्यांमुळे जनावरांना त्रास होतो, ताण येतो, आणि मॅस्टिटिससारख्या रोगांचा प्रसार होऊ शकतो. माश्यांचे चावणे आणि त्यांच्या सततच्या उपस्थितिमुळे जनावरांना खूप त्रास होतो, ज्यामुळे त्यांच्या दुधाच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो.
व्यवस्थापन (Pest Control In Dairy Industry)
- रासायनिक नियंत्रण: माश्यांचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक स्प्रे, पोर-ऑन किंवा इअर टॅग्स वापरण्यात येतात. हे रसायने माश्यांच्या प्रजनन आणि वासस्थाने कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
- जैविक नियंत्रण: माश्यांच्या अळ्यांवर आक्रमण करणारे परजीवी कीटक यांचा वापर करून माश्यांची संख्या कमी करता येते.
- पर्यावरणीय नियंत्रण: जनावरांच्या निवास स्थानांमध्ये साठलेला खत आणि कचरा योग्य पद्धतीने व्यवस्थापित केल्याने माश्यांच्या प्रजननाचे ठिकाण कमी होते, ज्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवता येते.
पिसवा (Fleas)
पिसव्यांमुळे जनावरांना खाज, त्वचेची जळजळ आणि विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो. पिसव्यांच्या चाव्यामुळे त्वचेवर खाज आणि जखम होऊ शकते, ज्यामुळे जनावरांना अत्यंत अस्वस्थता येते (Pest Control In Dairy Industry).
व्यवस्थापन
- रासायनिक नियंत्रण: पिसव्यांचे नियंत्रण करण्यासाठी पिसू पावडर, स्प्रे किंवा डिप्सचा वापर केला जातो. हे रसायन पिसव्यांचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
- स्वच्छता: जनावरांच्या राहण्याच्या ठिकाणांची नियमित साफसफाई आणि निर्जंतुकीकरण केल्याने पिसव्यांची संख्या कमी करता येते. जनावरांच्या बिछान्याची देखील स्वच्छता करणे गरजेचे आहे.
- पर्यावरणीय नियंत्रण: पिसवांच्या अळ्या आणि अंड्यांचा नाश करण्यासाठी वातावरणाचे उपचार करा. हे उपचार पिसवांच्या पुनरावृत्तीला रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
किडींच्या नियंत्रणासाठी विशिष्ट शिफारसी (Pest Control In Dairy Industry)
- निंबोळी तेल एक नैसर्गिक कीटकनाशक आहे, ज्याचा वापर टिक्स, माइट्स, आणि जूं यांच्यावर प्रभावी ठरतो. हे रसायनविरहित आणि पर्यावरणपूरक उपाय आहे.
- पारंपरिक हर्बल उपचार जसे की हळद आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण, जनावरांच्या त्वचेवरील किडींचा नाश करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
- ग्रामीण भागात माश्या आणि इतर किडींपासून जनावरांना दूर ठेवण्यासाठी गाईच्या शेणाची राख लावणे एक पारंपरिक पद्धत आहे. ही राख किडींना दूर ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
लेखक: शिवम सत्यवान मद्रेवार (राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कृषि महाविद्यालय, कोल्हापूर )