Namo Shetkari Mahasanman Yojana: राज्य शासनातर्फे नमो शेतकरी महासन्मानसाठी 2 हजार कोटी मंजूर; चौथा हप्ता लवकरच मिळणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी एवढे दिवस ज्याची आतुरतेने वाट बघत होते त्या नमो (Namo Shetkari Mahasanman Yojana) शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी (Fourth Installment) दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाला महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या (PM Shetkari Samman Nidhi) पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान योजना सुरु केली  होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात. राज्य सरकारने 2023-24  मध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Mahasanman Yojana) जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. राज्य सरकारने चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत (GR).

राज्य सरकारकडून खर्चाला मान्यता 

राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी (Namo Shetkari Mahasanman Yojana) आतापर्यंत 5512 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै या ती महिन्यांच्या कालावधीसाठी 1720 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी 1792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी 2 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. आता या योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या तीन हप्त्यांची रक्कम जमा झालेली आहे. आता राज्य सरकारने या योजनेच्या (Namo Shetkari Mahasanman Yojana) चौथ्या हप्त्यासाठी खर्चाला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आगामी काळात चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. 

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.