Kapus Soybean Farmers Beneficiary Status: कापूस व सोयाबीनचे अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करायचे आहे का? ‘ही’ पद्धत फॉलो करा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कालच कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली अशी बातमी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना (Cotton And Soybean Farmers) दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस (Kapus Soybean Farmers Beneficiary Status)

  • कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.
  • https://scagridbt.mahait.org/
  • सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Disbursement Status” वर क्लिक करा.
  • पुढे Disbursement Status पेज मध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करा.
  • त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) स्टेट्स विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.