हेलो कृषी ऑनलाईन : कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस/सोयाबीन अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी पंप (Battery Operator Sprayer Pump) (कापूस/सोयाबीन पीक) या योजनेकरिता महाडीबीटी मार्फत ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. महाडीबीटी या पोर्टलमार्फत राज्यातील कृषी विभागाच्या शेतकर्यांकरिता विविध योजना राबवल्या जातात.
बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी (Battery Operator Sprayer Pump) १०० टक्के अनुदान
राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४-२५ अंतर्गत बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी शेतकर्यांना १०० टक्के अनुदान देण्यात येणार होते. या योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकर्यांनी अर्ज केले होते. या योजनेची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही योजना लॉटरी पद्धतीने राबविण्यात आली होती. या लॉटरी पद्धतीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी मार्फत संदेश पाठवले आहेत. या लाभार्थ्यांना बॅटरी संचलित फवारणी पंपाचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी कृषी सहाय्यकाशी संपर्क करण्याचे संदेशात म्हटले आहे.
आवश्यक कागदपत्रे
– आधारकार्ड
– 7/12 उतारा
– 8-अ उतारा
– पिकांची माहिती
– आवश्यक असल्यास जातीचा दाखला
– बँक पासबुक झेरॉक्स (आधार संलग्न)
– मोबाईल क्रमांक