Gopinath Munde Farmer Accident Protection Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना; 30 कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत (Gopinath Munde Farmer Accident Protection Scheme) 30 कोटी रुपये निधी वितरित करण्यास कृषी विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये (Gopinath Munde Farmer Accident Protection Scheme) सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या तरतुदीतून 30 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना होणाऱ्या अपघातामुळे अपंगत्व येते तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस/ त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्य शासनाकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते.

अपघाताची बाब व आर्थिक सहाय्य

  • अपघाती मृत्यृ- रुपये 2 लाख
  • अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे- रुपये 2 लाख
  • अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रुपये 2 लाख
  • अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे- रुपये 1 लाख

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्याचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. 6- क नुसार झालेली वारसाची नोंद
  • शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करिता शाळा सोडल्याचा दाखला/ आधारकार्ड/ निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्राआधारे ओळख/ वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे
  • प्रथम माहिती अहवाल/ स्थळ पंचनामा/ पोलीस पाटील माहिती अहवाल
    अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे