Mother Name On Satbara: ‘या’ तारखेपासून सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावणे बंधनकारक! महिला सक्षमीकरणासाठी सरकारचा सकारात्मक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारने त्यांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी (Mother Name On Satbara) महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अजून एका शासन निर्णयाची (GR) भर पडलेली आहे. तो निर्णय म्हणजे आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) या अगोदर सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासोबतच आता सातबारा उताऱ्यावरही (Satbara Utara) आईचे नाव लावण्याचा (Mother Name On Satbara) महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे.

येत्या 1 नोव्हेंबर 2024 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार अशी माहिती हाती आली आहे. 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी (Land Purchase) करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव (Mother Name On Satbara) बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली गेली. लाडकी बहिण आणि लाडका भाऊ सारख्या योजना नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत. अवघ्या काही महिन्यांच्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) सरकारने काही अभिनव उपक्रम देखील हाती घेतले आहेत. आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. आणि या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबर 2024 पासून होणार असल्याची माहिती आहे.

अर्थातच आधीच्या सातबारा उताऱ्यावर बदल होणार नाही. पण 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक (Mother Name On Satbara) करण्यात आले आहे. मात्र, आता वडिलांचे नाव बंधनकारक राहणार नाही.

एवढेच नाही तर फेरफारमध्येही (Satbara Ferfar) आईचे नाव लावले जाणार आहे. तसेच, विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब अशी की याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे सादर सुद्धा केला आहे.

भूमी अभिलेख विभागाकडूनच याबाबतची माहिती समोर आली आहे. नक्कीच शासनाच्या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे सकारात्मक पाऊल टाकले जाणार आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.