Fruits and Vegetables From Maharashtra: महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला आता विकला जाईल गोव्याला, शेतकऱ्यांना होणार फायदा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आता महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला (Fruits and Vegetables From Maharashtra) गोव्यात सुद्धा विकला जाणार आहे. होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Farmers) ही महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला (Fruits and Vegetables From Maharashtra) गोव्यातील (Goa) विक्री केंद्राला (Sale Outlet) लिंक होणार आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार परमेंद्र शेट यांच्याशी फळे व भाजीपाला सप्लाय (Fruits and Vegetables From Maharashtra) करण्याबाबत बैठक झाली. 

या बैठकीतफळे व भाजीपाला पुरवठा (Fruits and Vegetables From Maharashtra) करण्याबाबतच्या अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फळे पुरवठा करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने भाजीपाला पुरवठा करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला. गोवा सरकार दीड हजार आउटलेटच्या (विक्री केंद्र) माध्यमातून ग्राहकांना माफक किमतीत भाजीपाला व फळे देण्याचा उपक्रम राबवीत आहे. फळे व भाजीपाला विक्री केंद्राचा उपक्रम राबविणारा गोवा हा देशातील पहिला राज्य आहे.  

कृषिमंत्री रवी नाईक यांच्यासोबत शेतकरी शिष्टमंडळाची चर्चा

गोव्याचे कृषिमंत्री (Goa Agriculture Minister) रवी नाईक यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील कृषीभूषण अंकुश पडवळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सोलापूरच्या शेतकरी शिष्टमंडळाने  फळे व भाजीपाला सप्लाय करण्याबाबत सविस्तर माहिती घेतली. शेतकरी शिष्टमंडळाने गोवा सरकारच्या गोव्यातील फळे व भाजीपाला 20 विक्री केंद्रांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेतली.

शेतकऱ्यांना काय होणार फायदा?

गोव्यातील फळे आणि भाजीपाली विक्री केंद्र हे देशासाठी आदर्श विक्री मॉडेल असणार आहे. महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला (Fruits and Vegetables From Maharashtra) गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी एक नवीन बाजार मिळणार त्यामुळे त्यांचा फायदा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांपेक्षा देखील चांगला बाजारभाव मिळेल. गोवा सरकारला गरजेनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला घेता येतील. या माध्यमातून थेट सरकारशी व्यवहार होणार आहे.

जर हे काम लवकर सुरु झाले तर गोवा सरकारकडून मागील तीन वर्षाचे बाजारभाव घेऊन विविध पिकांचे (Multi Cropping) नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती अंकुश पडवळे यांनी दिली. 

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.