हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात काही भागात सध्या जनावरात घटसर्प आजाराचा (Diphtheria Disease In Animals) प्रसार झाला असून यामुळे जनावरे दगावली आहेत.घटसर्प या आजाराला हेमोरॅजिक सेप्टिसिमिया तसेच डिप्थीरिया या नावाने सुद्धा ओळखतात. वातावरणातील बदलाचा परिणाम हा जनावरांवर देखील पाहवयास मिळतो. पावसाळ्याच्या तोंडावर घटसर्प ह्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा जनावरांमध्ये आढळून येतो. विशेषत: गाई आणि म्हशीमध्येच या (Cow And Buffalo Diseases) ची लक्षणे आढळतात. शिवाय हा संसर्गजन्य आजार (Animal Diseases) असल्याने त्याचा फैलावही लवकर होतो. यावर वेळीच उपाय झाला नाही तर जनावरे दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे वेळीच लसीकरण करुन घेणे हाच यामधील सर्वोत्तम पर्याय आहे. जाणून घेऊ या आजाराविषयी (Diphtheria Disease In Animals) आणि त्यावर उपचार पद्धती.
घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे (Diphtheria Disease Causes)
पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. शिवाय अस्वच्छ असलेल्या ठिकाणी जनावरे बांधली किंवा लांबचा प्रवास किंवा अतिकाम करून थकलेल्या प्राण्यांवर या आजाराचे जीवाणू हल्ला करतात. रोगाचा प्रसार खूप वेगाने होतो. आजारी जनावरांचा चारा, धान्य आणि पाणी यांचे सेवन आणि इतर जनावरे संपर्कात आली तर हा आजार (Diphtheria Disease In Animals) होतोच . तसेच मादी प्राण्याच्या दुधाने त्याचा प्रसार होतो.
घटसर्प आजाराची लक्षणे (Diphtheria Disease Symptoms)
- जनावरांना तीव्र ताप येतो, सुमारे 105 ते 106 डिग्री फॅ. पर्यंत हा ताप जातो
- डोळे लाल आणि सुजलेले दिसतात, नाक, डोळे आणि तोंडातून स्त्राव वाहतो
- मान, डोके किंवा पुढील पायांच्या दरम्यान सूज येते
- श्वास घेताना पुटपुटण्याचा आवाज येतो, श्वास घेण्यास त्रास होऊन गुदमरून जनावरांचा मृत्यू सुद्धा होतो.
घटसर्प आजारावर उपचार (Diphtheria Disease Treatment)
- या आजारावर (Diphtheria Disease In Animals) त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा जनावराचा यामध्ये मृत्यूही होऊ शकतो. घटसर्पची लक्षणे आढळून आल्यास लागलीच पशूवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करावी.
- जनावरांना दरवर्षी पावसाळयापूर्वी आजाराची लस जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात द्यावी. पावसळ्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे.
- जनावरांना घटसर्प आजाराची लक्षणे दिसताच बाधित जनावरांना इतर निरोगी प्राण्यांपासून जनावर वेगळे करावे.
- आजारी जनावरांना नदी, तलाव, तलाव इत्यादी ठिकाणी पाणी पिऊ देऊ नका.
- बाधित जनावराच्या आधी निरोगी जनावरांना चारा, धान्य, पाणी इत्यादी द्यावे.