शेतकऱ्यांनो तुम्हीही पशुपालनासोबत उद्योग सुरु करू इच्छिता ? सरकार करेल आर्थिक मदत

doodh dairy prakriya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र शासनाने गेल्या वर्षी ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी’ या नवीन योजनेस मंजुरी दिली मात्र या योजनेचा पंधरा हजार कोटींचा निधी या वर्षी देण्यात आला आहे. त्या विविध योजनेअंतर्गत दूध प्रक्रिया म्हणजेच (आईस क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर इत्यादी) मास निर्मिती व प्रक्रिया पशुखाद्य, टी एम आर ब्लॉग्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण मुरघास निर्मिती, पशु पक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 60 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून व्याजदरांमध्ये तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.

कसा घ्याल योजनेचा लाभ ?

— अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेरी विभागाच्या http://dahd.nic.in/ahdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
— सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर http://ahd.maharashtra.gov.in लिंक देण्यात आली असून या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

विविध उद्योग व्यवसाय या सोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र, पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन या बाबींचा समावेश केला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक शेतकरी उत्पादक संस्था खाजगी संस्था कलम 88 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल. या योजनेचा राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी उपयुक्त असून राज्यातील इच्छुक व्यावसायिक उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशु संवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.