Safe Use of Pesticide : रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना अशा प्रकारे घ्या काळजी

Safe Use of Pesticide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही वर्षामध्ये कीटकनाशकांची फवारणी (Safe Use of Pesticide) करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. पिकावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे किंवा हाताळणी केल्यामुळे अनेक शेतकरी व शेतमजूर विषबाधेमुळे मृत्यू होणे, डोळे निकामी होणे व इतर अपंगत्व होणे अशा अशा गोष्टी ओढवत आहे. त्यामुळे शेतीमध्ये रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना योग्य ती खबरदारी घेणे फार महत्त्वाचे आहे.

फवारणी करताना (Safe Use of Pesticide) हाताळताना घ्यावयाची काळजी

– कीटकनाशक फवारणीचा पंप इतर कोणत्याही कामाकरिता वापरू नका. किंवा तशी गरज पडल्यास दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तसेच साबण किंवा सोड्याने पंपाला स्वच्छ धुवून वापरावे. पंपातील औषध संपल्याची खात्री करावी.
– वाऱ्याचा वेग कमी असतानाच कीटकनाशकाची फवारणी करावी. कारण वाऱ्याचा वेग जास्त असल्यास औषध उलट दिशेने अंगावर येऊ शकते.

– शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करा. भर उन्हात फवारणी करू नये. कीटकनाशकाचे रिकामे डबे व्यवस्थित नष्ट करावेत. शक्यतो फवारणी करताना वेगळे कपडे, बुट वापरा. सोबतच हातमोजे, चष्मा व मास्क वापरावे.
– कीटकनाशक वापरण्यापूर्वी त्यासोबत आलेले माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे आणि खबरदारीच्या सुचनांचे पालन करा. फवारणी आटोपल्यानंतर आपले हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत. त्यापूर्वी कोणतेही काम करू नयेत.

– खाण्याचे पदार्थ, इतर औषध आणि लहान मुले यांच्याशी औषधाचा संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
– कीटकनाशक इतर औषध किंवा खतामध्ये शिफारशीशिवाय मिसळू नयेत. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
– फवारणी करताना विडी, सिगारेट ओढू नये. तसेच कुठल्याही प्रकारचे व्यसन यावेळी करू नये.
– मुदत संपलेली कीटकनाशके वापरू नयेत. फवारणी करण्यापूर्वी आपल्या हातापायावर जखमा तर नाहीत ना याची खात्री करावी. कारण जर आपल्या अंगावर किंवा फवारणी करणाऱ्याच्या अंगावर हातापायावर जखमा असेल तर ते जीवघेणे ठरू शकते. जखमांमुळे कीटकनाशक सरळ तुमच्या रक्तात मिसळू शकते.
– खूप जास्त प्रमाणात कीटकनाशकांचा वापर टाळावा. शिफारशी केलेल्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करा.
– फवारणीसाठी वापरलेला पंप कोठे गळत तर नाही ना, याची खात्री करावी. डब्यातून किंवा बाटलीतून औषध काढताना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नका, हे जीवघेणे ठरू शकते.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.