Ladki Bahin Yojana: बहुप्रतिक्षित लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेचा तिसरा हप्ता (Third Installment) महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसापासून महिलावर्गात लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार याबाबत उत्सुकता आणि चर्चा होती. शेवटी आज त्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने बहिणींना नवरात्रीच्या एक दिवस अगोदर आनंदाची बातमी मिळालेली आहे.

25 सप्टेंबर, 26 सप्टेंबर आणि 29 सप्टेंबर रोजी लाखो महिलांना या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ देण्यात आला आहे. ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे. आणि ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टीची खात्री करा (Aadhaar Bank Link)

बऱ्याच महिलांचे बँक खाते आणि आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले आहे का याची खात्री करा. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही.

तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे कसे तपासायचे?

या योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे तपासण्यासाठी खालील गोष्टी तपासा

ऑनलाइन बँकिंग: तुमच्या बँकेच्या ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे (Online Banking App) तुमच्या खात्यात कोणतेही पैसे जमा झाले आहेत का हे तपासू शकता. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला याची माहिती मिळेल.

बँकेत जाऊन चौकशी करा: तुम्ही तुमच्या बँकेत जाऊनही याबाबतची चौकशी करू शकता. बँक कर्मचारी तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तुम्हाला सांगतील.
मोबाइल मेसेज: अनेकदा बँका पैसे जमा झाल्याची माहिती तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे (Mobile Message) पाठवतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये तपासून पहा.

जर पैसे जमा झाले नसतील तर काय करावे?
जर तुम्हाला अद्याप पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा तालुका कार्यालयात संपर्क करावा. त्यांच्याकडून तुम्हाला याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.