हॅलो कृषी ऑनलाईन: शेळ्या मेंढ्यामध्ये आढळणारा आंत्रविषार (Enterotoxemia In Sheep And Goats) हा आजार पावसाळ्यात उगवलेले कोवळे लुसलुशीत गवत भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो. हा आजार (sheep goat diseases) सर्व वयोगटातील शेळ्या-मेंढ्यांना होतो. परंतु लहान करडे/कोकरांमध्ये मृत्युदर जास्त दिसून येतो. हा आजार कमी कालावधीचा आहे. प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते बारा तासांत मृत्यू होतो. त्यामुळे या आजारावर प्रतिबंधक उपाय (Preventive Treatment) करणे फारच गरजेचे आहे. जाणून घेऊ या आजाराची (Enterotoxemia In Sheep And Goats) लक्षणे आणि त्यावर उपचार.
आंत्रविषार आजाराची लक्षणे (Enterotoxemia Symptoms)
- शेळ्या-मेंढ्या निस्तेज दिसतात. एका जागेवर बसून राहतात. दूध पीत नाहीत.
- पातळ हिरव्या रंगाची संडास करतात.
- तोंडास फेस येतो, फिट येते.
- बाधित पिल्ले हवेत उडी मारून जमिनीवर पडतात. मान वाकडी होते. त्यांचा मृत्यू होतो.
- मोठ्या शेळ्या-मेंढ्या तीव्रतेनुसार काही दिवसांपर्यंत आजारी राहतात. ज्यामध्ये ताप येणे, तोंडातून फेस येणे, अडखळत चालणे, तोल जाणे, गोल फिरणे, चक्कर येणे तसेच श्वसनास त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसतात.
- शेवटच्या टप्यात (Enterotoxemia In Sheep And Goats) पोटफुगी, जुलाब ही लक्षणे आढळून येतात. पोट फुगल्यामुळे जनावर उठबस करतात. सारखे पाय झाडतात.
आंत्रविषार आजारावर उपचार (Enterotoxemia Treatment)
- हा अल्प मुदतीचा आजार (Enterotoxemia In Sheep And Goats) असल्यामुळे प्रभावी उपचार करणे शक्य होत नाही. यासाठी अधिक खर्चसुद्धा होतो. पशुवैद्यकाच्या सहाय्याने विशिष्ट प्रतिजैविके दिल्यास पोटातील विष शोषण्याचे प्रमाण कमी होते, जीवाणूंची वाढ थांबते. कळपातील मरतुक कमी होऊ शकते.
- एखादे लिव्हर टॉनिक व शिरेवाटे ग्लुकोज दिल्यास फायदा होऊ शकतो.
- प्रथमोपचार म्हणून लहान पिलांना हगवण सुरू झाल्यानंतर मिठाचे पाणी किंवा इलेक्ट्रोलाईट्सचे द्रावण पाजावे.
- आजारास (Enterotoxemia In Sheep And Goats) प्रतिबंध करणे, अत्यंत सोपे, कमी खर्चाचे, व प्रभावी मध्यम आहे. मुख्यता लसीकरण व आहारातील व्यवस्थापन करून या आजाराचा प्रादुर्भाव टाळता येतो.