Cotton Production In India: कमी लागवड क्षेत्र आणि अतिवृष्टीमुळे देशातील कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशात यंदा कापसाचे कमी लागवड क्षेत्र (Cotton Production In India) आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान यामुळे कापसाचे उत्पादन 2024/25 मध्ये 7.4% ने घसरून 30.2 दशलक्ष गाठींवर येण्याची अपेक्षा आहे. यामुळे कापसाची आयात 1.75 दशलक्ष वरून 2.5 दशलक्ष गाठी वाढण्याची शक्यता आहे तर निर्यात 2.85 दशलक्ष वरून 1.8 दशलक्ष गाठी एवढ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

वर्ष 2024/25 मध्ये देशातील कापसाचे उत्पादन (Cotton Production) मागील वर्षीच्या तुलनेत 7.4% कमी होऊन 30.2 दशलक्ष गाठींवर येण्याची शक्यता आहे. कमी लागवड क्षेत्र (Lower Area) आणि जास्त पावसामुळे (Excess Rain) पिकाचे नुकसान झाले आहे, असे एका व्यापार संस्थेने सांगितले आहे.

कमी उत्पादनामुळे 1 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या चालू विपणन वर्षात जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कापूस उत्पादक (Cotton Production In India) असलेल्या आपल्या देशातून होणारी निर्यात (Cotton Export) कमी होईल आणि जागतिक किमतींना आधार देण्यासाठी आयात वाढविणे गरजेचे ठरणार आहे.  

भारतीय कापूस असोसिएशन (CAI) ने एका निवेदनात म्हटले आहे की, भारताची कापूस आयात (Cotton Import) मागील वर्षीच्या 1.75 दशलक्ष गाठींवरून यावर्षी 2.5 दशलक्ष गाठींवर जाण्याची शक्यता आहे. तसेच देशाची कापूस निर्यात एका वर्षापूर्वीच्या 2.85 दशलक्ष गाठींवरून घसरून 1.8 दशलक्ष होण्याची अपेक्षा आहे.

सीएआयचे अध्यक्ष यांनी सांगितले की, देशाचे उत्पादन प्रामुख्याने लागवड क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे घटत आहे, जे एका वर्षापूर्वी 12.69 दशलक्ष हेक्टरवरून 11.29 दशलक्ष हेक्टरवर (Cotton Production In India) आले आहे.

देशातील अग्रगण्य कापूस उत्पादक (Cotton Production In India) असलेल्या गुजरात या पश्चिमेकडील राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला परतावा देणाऱ्या भुईमुगाच्या लागवडीसाठी कापसाखालील क्षेत्र कमी केले आहे. वर्ष 2024/25 मध्ये भारताची कापसाची मागणी गेल्या वर्षीच्या 31.3 दशलक्ष गाठींच्या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.