दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य योजनेवर केंद्राकडून शिक्कामोर्तब ; जाणून घ्या , कसा घ्याल योजनेचा लाभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्याचे योजना राबवली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच केली होती. या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत पुढील नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्नधान्य देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेचा देशभरातील 81 कोटी 35 लाख लोकांना लाभ होणार आहे. दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य योजनेअंतर्गत दिले जाईल. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेसाठी पात्र असलेल्या लोकांना योजनेनुसार पुढील पाच महिने मोफत धान्य मिळणार आहे.

योजना राबवण्यासाठी 67 हजार 266 कोटी रुपयांचा खर्च येणार असून तेवढा भारत सरकारच्या तिजोरीवर पडेल. जागतिक योग दिवसापासून म्हणजेच 21 जून पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना केंद्र सरकारकडून कोरोना वरील मोफत दिली जाणार असल्याची तसेच पाच महिलांसाठी मोफत अन्नधान्य दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात जून रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात वेळी केली होती. कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे अशा स्थितीत गोरगरिबांची आबाळ होऊ नये याकरिता दिवाळीपर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत अन्नधान्य वाटपाच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं होतं.

कसा घ्याल या योजनेचा लाभ ?

–तुम्हालाही सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्याही बँकेत आपले खाते उघडले पाहिजे.
–पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
–या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याकडे किती संपत्ती आहे हे सरकारला कळते.
–यानंतर, आपण खेड्यात राहत असल्यास आपल्याला ग्रामपंचायतीत जाऊन आपले नाव नोंदवावे लागेल.
–आपण शहरात रहात असल्यास आपल्याला पालिकेत जाऊन संपर्क साधावा लागेल.
–या योजनेत गरीब विभागातील लोक रेशनकार्डशिवायही मोफत धान्य घेऊ शकतात.
–याअंतर्गत गरजू लोकांना आधार कार्डमधूनच रेशन मिळते. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला या योजनेंतर्गत तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून नोंदणी करावी लागेल.
–नोंदणीनंतर तुम्हाला एक स्लिप दिली जाते. ही स्लिप दाखवून देखील तुम्हाला मोफत धान्य मिळू शकते.