पाणी टंचाईला वैतागून ‘या’ मराठी शेतकरी जोडप्याने खोदली अवघ्या 22 दिवसात विहीर; पहा Video

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : दुष्काळामुळे अनेकजण आजकाल स्थलांतर करत आहेत. सततच्या दुष्काळामुळे शेती पिकवणंही कठीण झालेले आहे. महाराष्ट्रात काही भागांत समाधान कारक तर काही भागात खूपच कमी पाऊस पडतो. परिणामी राज्यातील काही भागाला नेहमीच दुष्काळाला सामोरे जावे लागते. मात्र अहमदनगर जिल्हातील एक शेतकरी जोडप्याने पाणीटंचाईसमोर हार न मानता मेहनत करण्याचा निर्णय घेतला. जामखेड येथील एका कुटुंबाने अवघ्या 22 दिवसांत चक्क विहिरच खोदून काढली.

रामदास फोपाळे यांच्या कुटुंबीयांना व गावातील लोकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. रामदास फोपाळे दुसरे काही काम करत नव्हते. दिवसभराचा त्यांचा वेळ वाया जात होता. हा वेळ कुठेतरी कामी आला पाहिजे म्हणून त्यांनी विहीर खोदण्याचे ठरवले. पाण्यामुळे त्यांचे कुटुंब आणि गावातील लोक त्रस्त होते. त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता आणि अवघ्या २२ दिवसात हे कार्य करून दाखवले. सुरुवातीला त्यांना विश्वास नव्हता पण या विहिरीसाठी त्यांची बायको आणि मुलाचं मोलाचं सहकार्य लाभले.

Deprived of water, Maharashtra family digs well in 22 days

१ मे, महाराष्ट दिन या दिवशी त्यांनी विहीर खोदण्याचे काम सुरु केले. त्यादिवशीच रामदास फोफाळे यांचा वाढदिवस होता. हे काम त्यांनी एकूण ३० दिवसात केले, खरतरं २२ दिवसच त्यांनी काम केले. अवघ्या २० फुटावर पाणी लागले आणि काही पाण्याचा साठा राहण्यासाठी आणखी ५/६ फूट विहीर खोदण्याचे काम त्यांचे कुटुंब करणार आहे जेणेकरून गावातील लोकांना पाण्याचा उपयोग होईल.