जास्त दराने खतांची विक्री करणाऱ्या खते विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषी विभागाचेी मोठी कारवाई

Fertilizers
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद- हॅलो कृषी । शासनाने निर्देश देऊनही जादा दराने रासायनिक खतांची विक्री केल्याप्रकरणी तीन खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. रासायनिक खताची जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्यावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने नळदुर्ग व परिसरातील तपासणी केली असता, तीन खत विक्रेते जादा दराने विक्री करीत असल्याचे आढळून आले. तिन्ही दुकानांचे परवाने निलंबित करून त्यांना दंडही करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिल.

कारवाई करण्यात आलेल्या खतांच्या दुकानांमध्ये तुळजापूर तालुक्यातील श्रावणी ॲग्रो एजन्सीज नळदुर्ग, श्री समर्थ कृषी सेवा केंद्र मुर्टा, संघवी शेती उद्योग. नळदुर्ग या खत विक्री केंद्राचा समावेश आहे. खताच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याचे या केंद्रामध्ये आढळून आले. त्याअनुषंगाने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील तरतुदीनुसार तपासणी अहवाल पुढील कारवाईसाठी परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

केंद्राने शेतकऱ्यांना जादा दराने खतांची विक्री करणे, लिंकिंग करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, विक्री केंद्र,गोदामात उपलब्ध असलेल्या खताचा साठा याची माहिती भावफलकावर नोंद न करणे इत्यादी प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कृषी विभागाने दिला आहे. अश्या प्रकारावर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेबाबत व दराबाबत काही अडचण किंवा तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडुन करण्यात आले आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा