हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे खाद्यतेलाचे भाव कमी होऊ लागलेत यात सोयाबीन (Soybean) तेलाचाही समावेश आहे. जसजसं सोयाबीन तेलाचे भाव कमी होत आहेत त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरावर दिसून येत आहे सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच घसरण झालेली दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे तुरीचे उत्पादन कमी झाल्याने तुरीचा भाव मात्र चांगला आहे.
सोयाबीनचा घसरता भाव चिंताजनक
सोयाबीनचे भाव कमी झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत आले आहेत. तेलावरील विविध कर हटवल्यानंतर तेलाचे भाव घसरले आहेत त्यामुळे सोयाबीनचे देखील भाव कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मागच्या पंधरा-वीस दिवसांपासून तेलाचे भाव दररोज एक दोन रुपये किलो न कमी होत आहेत. एक ते दीड महिन्यांपूर्वी सोयाबीन तेलाचे भाव प्रतिलिटर 185 ते 190 रुपयांपर्यंत गेले होते ते भाव शनिवारी 140 वर आले होते. त्यामुळे सोयाबीनचे (Soybean) भाव देखील दिवसेंदिवस कमी होत आहेत.
सोयाबीन का घसरले?
केंद्र सरकारने तेलावरील कर कमी केल्याने सोयाबीनच्या तेलात एक ते दीड महिन्यात 50 रुपये किलो तेलाचे भाव कमी झाल्याने सोयाबीनचे भाव घसरले आहेत. सोयाबीनला गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रतिक्विंटल दहा हजार रुपये भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतलं. परिणामी सोयाबीनचे भाव खाली आले. यावर्षी सोयाबीनला (Soybean) सहा हजार पाचशे रुपये सर्वाधिक भाव मिळाला होता. भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन अद्याप घरात ठेवलेले आहे. शनिवारी सोयाबीनचा भाव 5800 रुपयांपर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांमध्ये घबराहाटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील अशा आशेने मोठ्या प्रमाणावर सोयाबीन घेऊन ठेवले त्यामुळे व्यापारी ही अडचणीत आहेत. सोयाबीनचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.