Baking Soda Uses: बेकिंग सोडा आहे शेतकऱ्यांसाठी वरदान; शेतात आणि बागेमध्ये या 10 प्रकारे वापरा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सामान्यता बेकिंग सोड्याचा वापर (Baking Soda Uses) स्वयंपाकात केला जातो. परंतु तुम्हाला माहित आहे का पिकांच्या चांगल्या वाढीसाठी बेकिंग सोडा बागायतदारांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. वास्तविक, शेतात बेकिंग सोड्याचा वापर करून शेतकरी कमी खर्चात त्यांच्या पिकांची चांगली वाढ करू शकतात. जाणून घेऊ या बागेत आणि शेतात (Baking Soda Uses In Garden And Agriculture) बेकिंग सोडा वापरण्याच्या 10 सर्वोत्तम पद्धती.

बेकिंग सोडा वापरण्याच्या 10 पद्धती आणि त्याचे आश्चर्यकारक फायदे (Baking Soda Uses)

नैसर्गिक बुरशीनाशक: पावडर मिल्ड्यू ज्याला आपण मराठीत भूरी रोग म्हणतो सारख्या बुरशीजन्य रोगांवर (Natural Fungicide For Diseases) बेकिंग सोडा (Baking Soda Uses) पाण्यात आणि द्रव साबणामध्ये मिसळून आणि वनस्पतींवर फवारणी करून नियंत्रित केले जाऊ शकते.

तणनाशक: तण मारण्यासाठी (Baking Soda As Weed Killer), तुम्ही जवळच्या झाडांना इजा न करता थेट बागेतील तणांवर बेकिंग सोडा वापरू (Baking Soda Uses) शकता.

कीटकनाशक: बेकिंग सोडा आणि मैदा यांचे मिश्रण झाडांवर फवारल्याने कोबी वरील अळ्या आणि मावा सारख्या कीटकांना प्रतिबंध (Baking Soda As Pesticide) करता येतो.

माती सुधारणे: बेकिंग सोडाचा वापर अती आम्लीय मातीला सुधारण्यासाठी (Soil Improvement), वनस्पतींच्या वाढीसाठी व पर्यावरण सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.

टोमॅटो स्वीटनर: मातीची आम्लता कमी करण्यासाठी टोमॅटोच्या झाडांभोवती बेकिंग सोडा (Baking Soda Uses)शिंपडल्यास टोमॅटो अधिक गोड होतील.

जलद कंपोस्टिंग: बेकिंग सोड्याच्या वापरणे जमिनीचे पर्यावरण अधिक अल्कधर्मी बनते त्यामुळे कंपोस्ट प्रक्रिया जलद होते.  

गंध शोषक: कंपोस्ट खत असलेल्या भागात बेकिंग सोडा शिंपडून बागांमध्ये दुर्गंधी नष्ट केली जाऊ शकते.

टूल क्लीनर: बेकिंग सोडा पेस्टने बागकामाची साधने साफ करणे खूप सोपे आहे. यामुळे घाण आणि गंज काढले जाते.