शेतकऱ्यांनो तुमच्या शेतात ‘ही’ जैविक पावडर वापरल्याने होतात महत्वाचे फायदे, ऐकून व्हाल थक्क !

nimoli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ओनलाईन : कडुनिंबापासून तयार होणाऱ्या निंबोळी पावडरचा शेतात वापर केल्याने अनेक महत्वाचे फायदे शेतकऱ्यांना होतात. कोकण वगळता संपुर्ण महाराष्ट्रात कडुनिंबाचे झाड आपल्याला आढळून येते. . त्यामुळे आपल्याला ती सहजासहजी उपलब्ध होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आर्थिक दृष्ट्याही फायद्याचे आहे.

निंबोळी पावडरचे फायदे

— निंबोळीमध्ये अॅझाडीरेक्टीन हा महत्वाचा घटक असतो. अॅझाडीरेक्टीन मातीतील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकांचा रोगांचा नायनाट करते.
–संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.
–निंबोळी पावडर रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.
–निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
–मर रोगांपासून पिकांचे संरक्षण करते.
–निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. (जमीन भुसभुशीत राहते.)यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
–तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते.

कशी वापराल निंबोळी पावडर

–सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी निंबोळी पावडर प्रति
–एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
–फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.
–सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.