हॅलो कृषी ऑनलाईन: निसर्गात (Human Face Goat Kid) केव्हा काय विचित्र घटना घडतील सांगता येत नाही. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील चेकबरडी गावात गुरूवारी एक विचित्र (Stranger Things) घटना घडली. शेतकरी मोतीराम आत्राम यांच्या घरी जन्मलेल्या एका बकरीच्या पिल्लाने सर्वांनाच थक्क केले. कारण हे पिल्लू एखाद्या माणसासारखे दिसत होते (Human Face Goat Kid).
या बकरीला (Goat) दोन पिल्लं झाली. त्यातलं एक पिल्लू नॉर्मल होतं. पण दुसरं पिल्लू हे सेम टू सेम माणसा सारखं दिसत होतं.
पांढरी दाढी, मानवी डोळे आणि चेहर्याचा आकार असलेले हे पिल्लू जन्मताच नाजूक होते (Human Face Goat Kid). आत्राम कुटुंबाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. या अनोख्या घटनेची बातमी गावात पसरताच, पिल्लाची झलक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची गर्दी उसळली.
पशुवैद्यांच्या मते, (Veterinary Doctor) हे जनुकीय बदल (Genetic Changes) किंवा गर्भावस्थेतील एखाद्या विकृतीमुळे घडले असू शकते. अशा विचित्र घटना क्वचितच घडतात आणि त्यामागे वैज्ञानिक कारणे असतात.
गावात खळबळ
गावात या घटनेची खूप चर्चा आहे. काही लोक याला अपशकुन मानत आहेत, तर काही जण हे कौतुहलाने पाहत आहेत. जन्म झाल्यानंतर हे पिल्लू नॉर्मल नव्हते. शिवाय ते अशक्तही वाटत होते. पिल्लाला काही करू वाचवले पाहिजे असे आत्राम कुटुंबाला वाटत होते. त्यासाठी आत्राम यांच्या पत्नी छाया आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र गुरूवारी सकाळी नऊ वाजता या पिल्ल्याचा मृत्यू झाला. या पिल्ल्याचे दफनविधी करण्यात आले. मोतीराम आत्राम यांनी पिल्लाचा मृतदेह गावातच पुरला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
या पिल्लाचे फोटो (Human Face Goat Kid) आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि चर्चा सुरू आहेत. काही जण याला निसर्गाचा चमत्कार (Nature Miracle) मानत आहेत, तर काही जण यामागे काही अलौकिक शक्ती असल्याचा अंदाज लावत आहेत.