Business Idea : बक्कळ पैसा कमवायचा असेल तर घरबसल्या आजच सुरु करा शेणाशी संबंधित ‘हे’ व्यवसाय; जाणून घ्या अधिक..

Business Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Business Idea | शेतकरी बांधवांनो भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीसोबत अनेक व्यवसाय केले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात मागणी असून शेतकरी प्रत्येक महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत. तुम्हीही हा व्यवसाय सुरु करून बक्कळ पैसे कमावू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कोणत्याही प्रशिक्षणासाठी ट्रेनिंगची गरज नसणार आहे. कोणते आहेत हे व्यवसाय जाणून घेऊयात सविस्तरपणे (Agriculture Business)

शेणापासून तयार केलेली अगरबत्ती

शेणापासून तयार केलेल्या अगरबत्तीला सध्या बाजारात सामान्य अगरबत्तीपेक्षा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कारण गाईचे शेण खूप पवित्र मानले जाते. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या सुरु करू शकता.

दिवे

शेणापासून बनवलेल्या दिव्यांना बाजारात चांगली मागणी आहे. या दिव्यांची विक्री परदेशात करण्यात येत आहे. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. यासाठी सर्वात अगोदर शेण कोरडे करून त्याची पावडर बनवा, त्यानंतर त्यात डिंक टाकून दिव्याचा आकार तयार करा. दोन ते चार दिवस उन्हात ठेवा. त्यानंतर त्याची विक्री करा.

शेणाची भांडी

फुलांच्या कुंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. कारण यामध्ये झाडे झपाट्याने वाढत असतात. ज्यावेळी हे भांडे वितळू लागते त्यावेळी तुम्ही त्याचा खत म्हणून वापर करू शकता.

शेणखत

शेण हे एक प्रकारचे सेंद्रिय खत असल्याने अनेकजण त्याचा वापर करतात. जर तुम्ही त्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही काही वेळात बक्कळ पैसा कमावू शकता.