हॅलो कृषी ऑनलाईन: काही दिवसांपासून भारतात काजूचे दर (Cashew Price) आभाळाला भिडले आहेत. हमखास उत्पन्न देणार्या काजू पिकाची परदेशातून होणारी आयात (Cashew Import) ठप्प झालेली आहे. दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) येणार्या प्रथम दर्जाच्या शुभ्र रंगाच्या काजूची आयात बंद झाल्याने भारतात काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. सध्या काजूच्या दरात (Cashew Price) सरासरी किलोला सरासरी 200 रूपयांनी दर वाढले आहेत.
यंदा हवामान बदलाचाही (Climate Change) मोठा फटका या पिकाला बसल्यामुळे स्थानिक उत्पादनातही (Cashew Production) मोठी घट आहे. उत्पादन आणि खर्च यांचा मेळ बसत नसल्याने, एकीकडे शेतकर्यांची चिंता वाढली असतानाच उद्योग अडचणीत येत आहे.
दक्षिण आफ्रिकेतून काजूची आयात बंद झाली आहे. स्थानिक पातळीवर कारखान्यांच्या संख्येत वाढ केल्याने काजू बाहेर पाठविण्यास त्या देशाने बंदी घातली आहे. याचा परिणाम या ठिकाणाहून येणाऱ्या काजू मालावर अवलंबून असणाऱ्या देशात काजूचा तुटवडा (Cashew Shortage) निर्माण झाला आहे.
भारतात काजूचे 40 टक्के उत्पादन होते. एक ते दोन महिनेच पुरतील, इतका काजू उपलब्ध असल्याने व्यापारी त्यांचा साठा करत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काजूचे दर (Cashew Price) आभाळाला भिडले आहेत. जगामध्ये भारताचा काजू लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनात पहिला क्रमांक लागतो जागतिक काजू अर्थव्यवस्थेत तो महत्त्वाचा घटक आहे.
काजूचे क्षेत्र (लाख हेक्टर मध्ये)
भारत 5.70
महाराष्ट्र 1.60
काजूचे दर (Cashew Price)
वेंगुर्ला 1050
गावठी 940
काजू बोंड निर्मिती 60%
वार्षिक उलाढाल 200 कोटी
काजू उत्पादन 03 लाख टन