Rice Variety: ‘ही’ आहे भारतातील पहिली नॉन-जीएमओ, तणनाशक आणि दुष्काळाला सहनशील, नॉन-बासमती तांदळाची जात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: ICAR-NRRI ने कटक, ओडिशा येथे विकसित केलेली (Rice Variety) आणि CVRC द्वारे 2023 मध्ये प्रसिद्ध केलेली ‘सी आर धान 807 (CR Dhan 807) ही तांदळाची नवीन जात (Rice Variety) आहे.

ही नॉन-जीएमओ (Non-GMO Rice Variety) तणनाशकास आणि दुष्काळाला सहनशील (Herbicide And Drought Tolerant), नॉन-बासमती तांदळाची जात शेतकऱ्यांना येणाऱ्या प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम आहे. झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, छत्तिसगड, आणि गुजरात यांसारख्या राज्यांमध्ये पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी ‘सी आर धान 807 जात (Rice Variety) शिफारस करण्यात आलेली आहे.

‘सी आर धान 807 ची अनुवांशिक रचना

  • CR Dhan 807 हे लोकप्रिय तांदूळ ‘सहभागीधन; (Sahbhagidhan) या मेगा व्हरायटी पासून निर्मित केलेली आहे
  • यामध्ये तणनाशक सहनशील जनुक (AHAS) समाविष्ट केले आहे.
  • तणनाशक सहनशील गुणधर्मामुळे शेतात तणनाशके वापरता येतात. त्यामुळे पिकाचे संरक्षण होऊन उत्पादकता वाढते आणि प्रभावी तण नियंत्रण होते.
  • सी आर धान 807 हे वाण (Rice Variety) कोरडवाहू उंच प्रदेशासाठी शिफारस केलेले असून  अनियमित पाऊस आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या वातावरणात वाढण्यास अनुकूल आहे.

‘सी आर धान 807 वैशिष्ट्ये

  • सी आर धान 807 हे 110-115 दिवसांच्या कमी कालावधीत परिपक्व होते, ज्यामुळे ते कमी कालावधीचा हंगाम असलेल्या प्रदेशांसाठी योग्य आहे.
  • हे वाण (Rice Variety) सरासरी 4.2 टन प्रति हेक्टर उत्पादन मिळवते. दुष्काळी परिस्थितीतही, ते 2.8 टन प्रति हेक्टर उत्पादन देते, त्यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीला हे वाण लवचिक आणि अनुकूल आहे.

आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे

  • त्याच्या कृषी फायद्यांच्या पलीकडे, सी आर धान 807 हे लागवडीशी संबंधित हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत करते.
  • CR Dhan 807 चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही जात (Rice Variety) भात शेतीच्या संपूर्ण यांत्रिकि‍करणास उपयुक्त आहे. अंग मेहनतीवरील अवलंबित्व कमी करते.
  • सामान्य शेतकऱ्यांना भेडसावणारे आव्हाने जसे मजुरीचे खर्च आणि मजुरांची कमतरता हे  लक्षणीयरीत्या कमी करते.
  • या वाणाला पारंपारिक पद्धतींच्या तुलनेत 25% कमी खते लागतात. यामुळे शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन मिळून पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण होते.
Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.