केंद्राकडून सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती

modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराबरोबरच मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल उचलले असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत सहकार विभाग हा कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या विभाग राहिला मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे सहकार हे स्वतंत्र मंत्रालय असेल नवे मंत्रालय स्थापण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळात सचिवालया तर्फे औपचारिक घोषणा करण्यात आली.

या पूर्वी मोदी सरकारने कृषी तसेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाची नाव बदलून अनुक्रमे कृषी व शेतकरी कल्याण आणि शिक्षण मंत्रालय अशी केली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने समुदाय आधारित विकासात्मक भागीदारी साठी आपली कटिबद्धता यातून दर्शवली आहे. सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय अर्थमंत्र्यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय घोषणेला अनुरूप आहे असं मंत्रिमंडळात सचिवालयाने म्हटलं आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सहकार मंत्रालय देशातील सहकार चळवळीला मजबूत करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय कायदेशीर आणि धोरणात्मक रचना तयार करेल तसेच सहकारी संस्थांना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जनभागीदारी आधारित चळवळीला बळकट करण्यासाठी मदत करेल. असं मंत्रिमंडळात सचिवालयाच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.