हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याचा कापूस बाजारभाव पाहता कापसाच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी १२ हजार रुपयांवर असणारा कापसाचा प्रतिक्विंटल भाव थेट ८००० ते ९००० रुपयांवर येऊन आदळला आहे. कापसाच्या उतरत्या दरामुळे वस्त्र उद्योगाला आता चिंता लागून राहिली आहे. शिवाय मागील हंगामात कापसाला चांगला भाव मिळाल्यामुळे यंदाच्या खरिपात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होईल असाही अंदाज आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
म्हणून कापसाच्या दरात घट
–सध्या कापसावरचे आयात शुल्क काढले आहे.
–आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 15 ते 20 टक्के कमी झाले आहेत. त्याचा परिणाम देखील भारतीय बाजारपेठांवर होत असल्याची तज्ञांची माहिती आहे.
— आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन यावर्षी वाढण्याचा अंदाज आहे.
–देशातील उत्पादन सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.
–क्षेत्र वाढत आहे, त्यामुळं किंमती कमी होत असल्याचे तज्ञ सांगतात.
–नुकसान वाचवण्यासाठी देशातील अनेक मील बंद ठेवल्या आहेत. त्याचा देखील किंमती कमी होण्यावर परिणाम होत आहे.
सूतगिरण्यांचे अर्थकारण बिघडणार ?
आता कापूस दर कमी झाल्याने सुताचे दरही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पण चढ्या दरानं कापूस घेतला असताना सूत कमी दराने विकावे लागल्याने सूतगिरण्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापूस दर कमी होणे हा बाजारपेठेला दिलासा असला तरी सूतगिरण्यांना तो त्रासदायक ठरला आहे. सुताचे दर कमी झाले तर त्याचा यंत्रमागधारकांना फायदा होऊ शकतो.
सध्याचे कापूस बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
22/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 51 | 8500 | 9000 | 8740 |
21/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 49 | 8500 | 9000 | 8735 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 60 | 8000 | 9650 | 9100 |
20/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 34 | 8500 | 9000 | 8750 |
19/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 59 | 8500 | 9000 | 8770 |
18/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 39 | 8500 | 9000 | 8760 |
16/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 12 | 8500 | 9000 | 8765 |
15/07/2022 | ||||||
जामनेर | हायब्रीड | क्विंटल | 28 | 8500 | 9000 | 8770 |