हेलो कृषी ऑनलाईन : शेळीला गरीबाची गाय असे संबोधले जाते. शेळी ही रोगाला (Deworm Goats) फारशी बळी पडत नाही, परंतु विशेषतः पावसाळ्यात शेळीची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता वेळेवर लसीकरण करणे, नियमित जंत निर्मुलन, गोठ्याची स्वच्छता, गव्हाणीचा वापर या बाबींचा आरोग्यावर निश्चित परिणाम होतो.
शेळ्यांच्या जंतनिर्मुलनासाठी जंतनाशकाचा (Deworm Goats) वापर
शेळ्यांची सदृढ पचनसंस्था व आरोग्यासाठी जंत निर्मुलन करून घेऊन खालीलप्रमाणे जंतनाशक औषधांचा वापर करावा. करडांच्या वयाच्या 20 ते 30 दिवसापासून जंतनाशक औषधे देता येतात.
जानेवारी व जुलै : अल्बेन्डाझॉल 10 मि.ग्रॅ. प्रति किलो वजनाप्रमाणे चपटेकृमी व गोलकृमी जंतांच्या निर्मुलनासाठी वापरावे.
एप्रिल व ऑक्टोबर : डोस्टोडीन किंवा झोनील पैकी कोणतेही एक औषध यकृत कृमीच्या निर्मुलनासाठी 10 मि.ग्रॅ. प्रतिकिलो वजनाप्रमाणे वापरावे.
लाळ्याखुरकत : हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाच्या प्रमुख लक्षणामध्ये शेळ्यांच्या जिभेवर तोंडात, पायात, कासेवर आणि तोंडाच्या आतील भागावार फोड येतात. तोंडातून जास्त प्रमाणात लाळ पडते.
उपचार व प्रतिबंध : या रोगामुळे शेळ्यांचे खाणे-पिणे कमी होते. त्यामुळे शेळ्या कमजोर होतात. त्याकरिता त्यांना पाण्यातून जीवनसत्त्वे द्यावेत. जिभेचे फोड अन्टीसेप्टीक औषध लावून धुवावे. प्रतिबंधात्मक उपचाराकरिता वर्षातून दोन वेळा लस टोचून घ्यावे. (1 मि.ली.)
वरीलप्रमाणे शेळ्यांचे व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना शेळीपालन एक किफायतशीर व्यवसाय फायद्याचा ठरेल व शेळीपालकांचा आर्थिक स्तर उंचावेल.