‘या’ योजनेतून नवीन विहिर,जुनी विहीर दुरुस्तीसाठी मिळावा अनुदान, असा करा ऑनलाईन अर्ज

vihir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : तुम्हाला जर नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती , शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण,ठिबक सिंचन ,अशा घटकांसाठी शासनाकडून आर्थिक हवी असेल तर तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मदत करेल. या योजनेतील पात्र लाभार्थी आपल्या शेतीकरिता आर्थिक मद्त मिळवून घेऊ शकतात जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती…

याकरिता मिळते अनुदान

या योजनेअंतर्गत नवीन विहीर( २. ५० लाख ), जुनी विहीर दुरुस्ती(50,000) ,इन वेल बोरिंग (20,000),पापं संच (20,000), वीज जोडणी आकार (दहा हजार), शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण (एक लाख) व सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन संच (50 हजार) किंवा तुषार सिंचन संच (25000) ,पीव्हीसी पाईप (30000) परसबाग (पाचशे रुपये) या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

पात्रता
– याकरिता लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
– लाभार्थ्याने जातीचा वैद्य दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
– जमिनीचा सातबारा व ८- अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
– लाभार्थीची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
-उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे
– लाभार्थीची जमीनधारणा 0. 20 हेक्‍टर ते सहा हेक्‍टर पर्यंत ,(नवीन विहिरीसाठी) किमान 0. 40 हेक्टर असणे बंधनकारक आहे.

नवीन विहिरीकरिता आवश्यक कागदपत्रे

-सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र
– सातबारा व आठ- अ चा उतारा
– तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र ( रुपये एक लाख पन्नास हजारांपर्यंत )
– लाभार्थी चे प्रतिज्ञापत्र शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर.
– अपंग असल्यास प्रमाणपत्र
– तलाठी यांचेकडील दाखला सामायिक एकूण धारण क्षेत्राबाबतचा दाखला 0 45 ते सहा हेक्‍टर मर्यादित विहरी नसल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटांपेक्षा जास्त अंतरावर असलेला दाखला. प्रस्तावित विहीर सर्वे नंबर नकाशा व चतु:सीमा
– भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे रिपोर्ट.

असा करा अर्ज

-या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या . उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय उपलब्ध असेल तिथे ‘मराठी’ पर्यायावर क्लीक करा.
-‘शेतकरी योजना’ पर्याय निवडा.
– ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ यावर क्लिक करा.
– या योजनेबाबत अनुदान पात्रता या सर्वांची माहिती दिसेल.
-उजव्या कोपऱ्यात नवीन ‘अर्जदार नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करा.
-विचारलेली माहिती भरा
-त्यानंतर ‘अर्जदार लॉगईन’ पर्यायावर क्लिक करा. लॉगिन प्रकार निवडून वापर ‘कर्ता आयडी’ किंवा ‘आधार क्रमांक’ टाका.
-त्यानंतर ‘प्रोफाईल स्थिती’ हे वेब पेज ओपन होईल.
-तिथे ‘अर्ज करा’ हा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर क्लिक करा.
-त्यानंतर नवीन वेब पेज ओपन होइल त्यामध्ये शेवटचा पर्याय ‘ अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना ‘ या पर्यायावर क्लिक करा.
-त्यापुढे उजव्या कोपऱ्यात ‘बाबी निवडा’ असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
-तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का तपासून पहा..
-‘घटक निवडा’ या पर्यायावर तुम्हाला हवा तो ऑप्शन निवडा( जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, ठिबक सिंचन संच, पंप संच, वीज जोडणी आकार, शेततळ्यास अस्तरीकरण, नवीन विहीर इ. ) एकवेळेला एकच पर्याय निवडू शकता.
-त्यानंतर जतन करा पर्यायवर क्लीक करा. Ok बटन वर क्लीक करा.
-त्यानंतर ‘अर्ज सादर करा’ या बटनावर क्लिक करा

अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉटरी लागेल आणि लॉटरी मध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल. त्यानंतर जर तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमची कागदपत्र भरावे लागतील. अर्ज करताना कागदपत्रे भरण्याची आवश्यकता नसते. समजा यावेळेस लॉटरी नाही लागली तर तो तुमचा अर्ज पुढच्या लॉटरीसाठी गृहीत धरला जाऊ शकतो.