Drought Subsidy: सोलापूर जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकर्‍यांना मिळणार दुष्काळी अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप दुष्काळ 2023 च्या (Drought Subsidy) अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) 5 लाख 19 हजार 849 बाधित शेतकर्‍यांना (Farmers) 689 कोटी अनुदान महसूल व वन विभागाकडील 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूर अनुदान (Drought Subsidy) झालेले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे.

ई-केवायसी (ekyc) न केलेल्या ज्या शेतकर्‍यांना अनुदान (Drought Subsidy) मिळाले नाही, त्या शेतकर्‍यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकर्‍यांनी 10 जुलै 2024 पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

सद्यस्थितीत बार्शी तालुक्यातील 3550, माढा तालुक्यातील 3240, करमाळा तालुक्यातील 1970, सांगोला तालुक्यातील 3678 आणि माळशिरस तालुक्यातील 5428 बाधित शेतकर्‍यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने रक्कम 21 कोटी 65 लाख 56 हजार 495 रुपये प्रलंबित आहे.

तसेच, सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित 1 लाख खातेदारांना त्यांची बँक व आधारकार्ड संलग्न नसल्यामुळे, सामाईक खातेदारांची कोणत्या खात्यावर रक्कम जमा करावी, याबाबतची संमतीपत्र दिले नसल्याने, मृत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने, तसेच परगावीच्या खातेदारांचे बँक तपशील, आधारकार्ड तपशील इ. उपलब्ध न झाल्याने अनुदान (Drought Subsidy) वाटप करणे प्रलंबित आहे.

अनुदान (Drought Subsidy) न मिळालेल्या खातेदारांना कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत संबंधित तलाठी कार्यालय अथवा तहसील कार्यालय यांच्याकडे 10 जुलै 2024 पूर्वी संपर्क करण्याचे आवाहन केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

शेतकर्‍यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर
दरम्यान, बार्शी, माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे. अनुदान बार्शी तालुक्यातील 31 हजार 395 बाधित शेतकरी, माढा तालुक्यातील 76 हजार 724 बाधित शेतकरी, करमाळा तालुक्यातील 72 हजार 113 बाधित शेतकरी, सांगोला तालुक्यातील 75 हजार 616 बाधित शेतकरी आणि माळशिरस तालुक्यातील 77 हजार 951 बाधित शेतकर्‍यांना मदत निधी वितरीत करण्यासाठी संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकर्‍यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी दिली आहे.

तीन लाख शेतकर्‍यांना मिळाली मदत
शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील 21 हजार 252, माढा तालुक्यातील 64,871 करमाळा तालुक्यातील 62,859, सांगोला तालुक्यातील 64,650 आणि माळशिरस तालुक्यातील 63,792 असे एकूण 2 लाख 77 हजार 424 बाधित शेतकर्‍यांना 489 कोटी रकमेच्या मदतीचा समावेश आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.