Insecticide For Vegetable Crops: खरीप भाजीपाला पिकांवरील कीड नियंत्रणासाठी ‘हे’ आहे प्रभावी कीटकनाशक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप भाजीपाला पिकांवर वेगवेगळ्या किडींचा (Insecticide For Vegetable Crops) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. आज आम्ही तुम्हाला अशा कीटकनाशकाबद्दल (Insecticide) माहिती देणार आहोत जे किडींचे प्रभावी नियंत्रण (Insecticide For Vegetable Crops) तर करतेच शिवाय कमी किमतीत सुद्धा उपलब्ध आहे.

धानुका एग्रीटेक (Dhanuka Agritech) व जपानी कंपनी निसान केमिकल्स कॉर्पोरेशन (Nissan Chemical Corporation) जपान संयुक्तपणे सादर करत आहे, आधुनिक आणि क्रांतिकारी कीटकनाशक (Insecticide For Vegetable Crops), ‘लानेवो’ (Lanevo).

हे एक नवीन आणि शक्तिशाली कीटकनाशक (Insecticide For Vegetable Crops) आहे जे भाजीपाल्यावरील प्रमुख रसशोषण करणाऱ्या किडी (Sucking Pests) व अळ्यांचे (Vegetable Larvae) सशक्तपणे नियंत्रण करण्यास सक्षम आहे.

‘लानेवो’ हे कीटकनाशक किडींवर कसे काम करते?

  • हे कीटकनाशक संदेश किडींच्या मज्जासंस्थेच्या संदेश वहनामध्ये हस्तक्षेप करते त्यामुळे मज्जासंस्थेची सामान्य क्रिया बाधित होऊन किडीचा मृत्यू होतो.
  • हे कीटकनाशक (Insecticide For Vegetable Crops) किडींना अति उत्तेजित करतात त्यामुळे किडींची उपासमार होऊन ते मरतात.

वेगवेगळ्या पिकांवरील किडीसाठी वापर पद्धती आणि प्रमाण

  • चांगल्या परिणामासाठी लानेवोचा वापर कीडींच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये शिफारस केलेल्या पिकांवरच करावा.
  • लानेवोचा वापर एक एकर पीक क्षेत्रासाठी 250 मिली, 150-200 लिटर पाण्यात मिसळून करावा.
  • शेतकर्‍यांच्या गरजेप्रमाणे लानेवो 50 मिली, 250 मिली आणि 500 मिली या पॅकिंग मध्ये बाजारात उपलब्ध.
पिककिडीप्रमाण/प्रति एकर
मिरचीफुलकिडी, पांढरी माशी, फळ पोखरणारी अळी250 मिली
वांगेतुडतुडे, पांढरी माशी, शेंडा व फळ पोखरणारी अळी250 मिली
टोमॅटोनागअळी, फळ पोखरणारी अळी250 मिली

‘लानेवो’ कीटकनाशकाची वैशिष्ट्ये (Insecticide For Vegetable Crops)

  • या कीटकनाशकात दुहेरी शक्ती आहे जे रस शोषण करणाऱ्या किडी आणि अळ्यांवर दुपटीने परिणाम करते  व त्यांचे नियंत्रण करते.
  • हे कीटकनाशक दुहेरी पद्धतीने म्हणजे स्पर्शजन्य (Contact Poison) आणि शरीरात जाऊन क्रिया करते त्यामुळे किडींचे प्रभावी नियंत्रण होते.
  • नियंत्रणाच्या दुहेरी क्रिया पद्धतीमुळे हे पानांच्या खाली लपलेल्या कीटकांवर सुद्धा सहजपणे नियंत्रण मिळवते.
  • लानेवो एक बहुआयामी कीटकनाशक आहे की जे अत्याधुनिक आणि पारंपरिक स्वरुपाचे दर्जेदार संरक्षण प्रदान करते.
  • हे कीटकनाशक पावसाने धुवून जात नाही (पावसाळी वातावरणात सुद्धा फवारणीस योग्य, कारण फवारणीनंतर 3 ते 4 तासानंतर पाऊस पडल्यास धुवून जात नाही)

‘लानेवो’ कीटकनाशकाचे फायदे

  • फवारणीच्या खर्चात बचत.
  • इतर कीटकनाशकांना प्रतिरोधक कीटकांवर देखील प्रभावी (प्रतिरोधक होण्याची शक्यता कमी).
  • कमी नुकसानकारक, चांगली गुणवत्ता, उच्च उत्पादन मूल्य, कमी खर्च आणि जास्त नफा.
  • पानाखाली लपलेल्या किडींवरही प्रभावी नियंत्रण.
  • पावसाळ्यातही सहज फवारणी करता येते.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.