Electric Tractor For Agriculture: ‘हा’ आहे भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; 3 तासात होतो चार्ज, करतो नॉन-स्टॉप 8 तास काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांच्या खर्चात बचत करण्यासाठी (Electric Tractor For Agriculture) ऑटोनेक्स्ट एक्स 45 हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर (AutoNxt X45 Tractor) ऑटोनेक्स्ट (AutoNxt) कंपनीने लॉन्च केले आहे. भारतातील हा पहिला ट्रॅक्टर आहे (Electric Tractor For Agriculture), जो डीजेल किंवा अन्य इंधन ऐवजी पूर्णपणे बॅटरीवर चालतो.

डीजेलच्या वाढत्या किमती शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनते. देशातील काही मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी (Tractor Manufacturer Company) बॅटरीवर चालवणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मार्केटमध्ये आणले आहेत. यापैकीच एक ऑटोनेक्स्ट (AutoNxt) देखील आहे.  

या इलेक्ट्रीक ट्रॅक्टरच्या (Electric Tractor For Agriculture) मदतीने शेती उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचे काम अधिक सहज आणि चांगले होईल. ऑटोनेक्स्ट इलेक्ट्रीक ट्रॅक्टरमध्ये पावरफुल मोटर आहे, ज्यामुळे शेतीचे कठीण काम (Agriculture Work) देखील सहजपणे  करता येते.

जाणून घेऊ या ऑटोनेक्स्ट एक्स 45 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये, फीचर्स आणि किंमत.

ऑटोनेक्स्ट एक्स 45 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये (AutoNxt X45 Tractor Specifications)

  • AutoNxt कंपनी हा ट्रॅक्टर (Electric Tractor For Agriculture) दिसायला कोणत्याही पारंपरिक ट्रॅक्टरसारखा असला तरी शेतीशी संबंधित सर्व कामे करते.
  • ऑटोनेक्स्ट एक्स 45 ट्रॅक्टरमध्ये 32 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर तयार केली आहे, जो मैक्सिम 45 हॉर्स पॉवर जनरेट करू शकते.
  • या ट्रॅक्टरमध्ये (Electric Tractor For Agriculture) 35 KWHr क्षमता असलेली बॅटरी आहे ज्यामुळे ते एकदा चार्ज केल्यावर अंदाजे 8 एकर शेतात 8 तास सहज काम करू शकतो. हेवी ड्युटी दरम्यान, हा ट्रॅक्टर एका चार्जवर सुमारे 6 तास काम करू शकतो

3 तासात पूर्ण चार्ज होते

घरगुती सॉकेट (15A) शी जोडून हा ट्रॅक्टर सहजपणे चार्ज केला जाऊ शकतो. हा ट्रॅक्टर नियमित म्हणजेच सिंगल फेज चार्जरने चार्ज केल्यास त्याची बॅटरी 0 ते 100% पर्यंत चार्ज होण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. पण थ्री-फेज चार्जरच्या सहाय्याने तुम्ही या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी (Electric Tractor) अवघ्या 3 तासांत पूर्णपणे चार्ज करू शकता. ऑटोनेक्स्ट X45 ट्रॅक्टरची उचल क्षमता 10 ते 15 टन ठेवण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर (Electric Tractor For Agriculture) डिझेल ट्रॅक्टरप्रमाणेच जवळपास सर्व कृषी उपकरणे चालवू शकतो.

AutoNxt X45 ट्रॅक्टरची इतर वैशिष्ट्ये (AutoNxt X45 Tractor Features)

  • ऑटोनेक्स्ट एक्स 45 ट्रॅक्टर कृषी कामांव्यतिरिक्त (Electric Tractor For Agriculture), सिमेंट उत्पादन, बांधकाम उद्योग, धातू उत्पादन, विमानतळ आणि संरक्षणाशी संबंधित कामांसाठी उपयुक्त आहे.
  • या ट्रॅक्टरची देखभाल करणे खूपच किफायतशीर आहे.
  • डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत ऑटोनेक्स्ट ट्रॅक्टर कमी खर्चात जास्त काम करतात.
  • उत्कृष्ट कामगिरीसाठी, कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये उच्च टॉर्क आणि तीव्र प्रवेग दिला आहे.
  • इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असल्याने त्याचा वापर अगदी शांत आहे. हा ट्रॅक्टर कोणताही आवाज न करता शेतात वापरता येतो.
  • कंपनीच्या म्हणण्यांनुसार, या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या बॅटरीचे लाइफ सायकल 3000 आहे, म्हणजेच ते 8 ते 10 वर्षे चांगले काम करू शकते.

ऑटोनेक्स्ट एक्स 45 ट्रॅक्टरची किंमत (AutoNxt X45 Tractor Price)

भारतात Autonext X45 ट्रॅक्टरची सुरुवातीची किंमत 15 लाख रुपये आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या किमतीत इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदानाचा समावेश नाही. इलेक्ट्रिक वाहनांवर उपलब्ध सबसिडी वेगवेगळ्या राज्यांवर अवलंबून असेल, त्यानंतर ऑटोनेक्स्ट X45 ट्रॅक्टरची किंमत वाढेल किंवा कमी होईल.