हॅलो कृषी ऑनलाईन : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत (Farmer Accident Insurance) कृषी विभागाने शेतकरी अपघाताचे 2453 दावे निकाली काढले आहे. त्यापोटी संबंधित सर्व शेतकऱ्यांना 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा (Farmer Accident Insurance) शासन निर्णय राज्य सरकारकडून आज जारी करण्यात आला आहे.
काय आहे ‘ही’ योजना? (Farmer Accident Insurance For Farmers)
शेती व्यवसाय करताना अंगावर वीज पडणे, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे अपघात, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा अपघात (Farmer Accident Insurance) होऊन, त्यांना कायमचे अपंगत्व येते. किंवा त्यांचा मृत्यू ओढावतो. परिणामी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या अशा एकाएकी मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर आर्थिक परिस्थिती निर्माण होते. तसेच त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा शेतकरी कुटुंबाला आर्थिक लाभ मिळावा. या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्य सरकारकडून राबविली जाते.
एकूण 48 कोटींचा निधी मंजूर
राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या 138 दिवसांच्या खंडित कालावधीतील 77 (73 मृत्यू व 4 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 1 कोटी 51 लाख रुपयाचा विमा वितरित करण्यात येणार आहे. तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील 239 दिवसांच्या खंडित कालावधीतील पहिल्या टप्प्यातील 239 (237 मृत्यू व 2 अपंगत्व) पात्र दाव्यांपोटी 4 कोटी 76 लाख रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यात 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यातील 2137 (2094 मृत्यू व 43 अपंगत्व) पात्र शेतकऱ्यांच्या दाव्यांपोटी 42 कोटी 36 लाख रुपये दिले जाणार आहे. अशा प्रकारे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पात्र दाव्यांच्या अनुषंगाने अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांना आर्थिक मदतीची 47 कोटी 12 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे. अर्थात राज्यात 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 आणि 23 ऑगस्ट 2022 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीतील एकूण 2453 शेतकरी दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यापोटी 48 कोटी 63 लाख रुपये वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जीआर :
जीआर क्रमांक 1 – (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061531128401.pdf)
जीआर क्रमांक 2 – (https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402061531025601.pdf)