हॅलो कृषी ऑनलाईन: दक्षिण कन्नडपासून पाच किलोमीटरवर केरळच्या कासरगोड स्थित नेट्टानेगी या गावात राहणारे सत्यनारायण बेरेली (Farmers Success Story) हा शेतकरी सध्या चर्चेचा विषय आहे ते म्हणजे त्याला प्राप्त झालेल्या पदमश्री सन्मानाबद्दल (Padmashri Award). परंतु त्यांनी केलेल्या कार्याबद्दल तुम्ही ऐकले तर त्यांना मिळालेला पुरस्कार किती सार्थ (Farmers Success Story) आहे याची प्रचिती नक्कीच येईल.
सत्यनारायण बेरेली हे गेले 15 वर्ष धानाच्या (भाताच्या) पारंपरिक जाती टिकविण्यासाठी कार्य करत आहेत. परिसरातील लोक त्यांना ‘सीडिंग सत्या’ या नावानेही ओळखतात. कारण ते धानाच्या पारंपरिक जाती टिकवण्यासाठी बियाणे तयार करत आहेत. त्यांच्या बँकेत सध्या 650 हून अधिक पारंपरिक तांदळाच्या जाती आहेत. पारंपरिक वाणांचे संवर्धन आणि बियाणे बँकेमुळे त्यांना ही ओळख मिळाली आहे. त्यांची ही बियाणे बँक बघण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी येतात. त्यांनी संशोधन केंद्रांना सुद्धा तांदळाच्या 50 जाती उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तसेच शेतकर्यांना मोफत भाताचे बियाणे वाटून त्यांनी संशोधना सोबतच संवर्धनाला सुद्धा चालना दिलेली आहे.
एवढेच नाही तर ‘राजकायम’ भाताची शेती करण्याचे श्रेय सुध्दा सत्यनारायण यांनाच दिले जाते (Farmers Success Story). त्यांच्या मदतीने कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मधील शेतकरी राजकायम भाताची शेती करत आहेत.
सत्यनारायण हे ‘पॉलीबॅग पद्धती’साठी सुद्धा ओळखले जातात. वेगवेगळ्या जातींची लागवड ते ‘पॉलीबॅग मध्ये करतात. देशी तांदळाव्यतिरिक्त सुपारी, जायफळ आणि काळी मिरी यांच्या पारंपरिक बिया देखील ते जतन करतात. त्यांच्या वाढलेल्या पिशव्यांमध्ये सुमारे 100 जाती आहेत.
त्यांनी पिकवलेल्या काही जातींना औषधी महत्त्व आहे. ते त्यांच्या पिकासाठी फक्त सेंद्रिय खते वापरतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारतातील धानाच्या काही दुर्मिळ जाती आहेत. उदाहरणार्थ, एडी कुनी हा वाण पुराच्या जास्त पाण्यातही तग धरून राहू शकतो, तर मनिला जातीची लागवड खाऱ्या पाण्यात करता येते. याशिवाय सुगंधी तांदळाच्या विविध जातीही त्यांच्या सीड बँकेत आहेत. सत्यनारायण बेल्लेरी यांनी शिवम आणि त्रिनेत्र या दोन नवीन जातीही विकसित केल्या आहेत .
पद्मश्री पुरस्कारासाठी त्यांचे नावे जाहीर झाल्यावर आता आपली जबाबदारी वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे (Farmers Success Story).