हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय शेतकरी जुगाड (Farming Jugad) करण्याच्या बाबतीत चांगलाच हुशार आहे. कधी कधी तो असा जुगाड करतो की भल्याभल्यांना तोंडात बोट घालावी लागतील. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एका शेतकर्याने फवारणीसाठी जुगाड (Farming Jugad) बनवल्याचे दिसत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ परभणी (Parbhani Farmer) जिल्ह्यातील सेलू (Selu Taluka) तालुक्यातील असून येथील एका शेतकर्याने थेट ट्रॅक्टरलाच फवारणी मशीन (Tractor With Sprayer) जोडले असून आडवा पाईप लावून त्याला फॉगर (Fogger) बसवले आहेत. यामुळे एकाच वेळी जवळपास 15 ते 18 फूट अंतरावरील क्षेत्रावर फवारणी केली जाऊ शकते. तर ट्रॅक्टरचे चाक काढून त्याला वेगळे चाकही बसवण्यात आले आहे.
सोयाबीन पिकावर फवारणी (Soybean Crop Spraying) केली जात असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असून या यंत्राद्वारे केवळ पाच मिनिटांच्या वेळात एका एकरावर फवारणी केली जाऊ शकते. शेती कामासाठी मजूरांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असताना हे तंत्रज्ञान (Farming Jugad) जास्तीत जास्त शेतकरी शेती कामासाठी वापरात आणण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातील ड्रायव्हरविना चालणाऱ्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यामध्ये जीपीएस ऑटो पायलच या टूल्सचा वापर करून शेतकर्याने ड्रायव्हरविना ट्रॅक्टरद्वारे पेरणी (Sowing) शक्य असल्याचं दाखवून दिलं होतं. त्यानंतर आता पाच मिनिटांत एका एकरावर पेरणी करणाऱ्या ट्रॅक्टरचे जुगाड (Farming Jugad) शेतकर्याने तयार केले आहे.
हे सुद्धा वाचा: विना ड्रायव्हर ट्रॅक्टर करतंय शेतात सोयाबीन अन् तुरीची पेरणी!
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान (Agriculture Mechanization) दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे शेतीची कामे सोपी होत चालली आहे. फवारणी, पेरणी, खुरपणी, काढणी, मळणी आणि काढणी नंतरच्या इतर सर्व कामामध्ये तंत्रज्ञानाचा (Agriculture Technology) वापर होताना दिसत आहे. शेतकरी नवनवे जुगाड (Farming Jugad) करून फक्त शेतीची कामे सोपी करत आहेत असे नाही तर यामुळे पैशाची, श्रमाची आणि मजूरांची सुद्धा बचत करत आहेत.