हॅलो कृषी ऑनलाईन: एफएमसी इंडियाने (FMC India) फळे आणि भाजीपाला पिकांचे बुरशीजन्य (Fungicides) रोगांपासून संरक्षण व रोग प्रतिकारक व्यवस्थापन करून पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी ‘वेल्झो’ (Velzo) आणि ‘कोसूट’ (Cosuit) ही नाविन्यपूर्ण बुरशीनाशके (Fungicide Products) जून महिन्यात लाँच केली आहेत.
ही बुरशीनाशके (Fungicides) सुरुवातीच्या अवस्थेपासून फळे आणि भाजीपाला पिकांचे हानिकारक बुरशीजन्य रोगांपासून (Fungal Diseases) संरक्षण करते. ही उत्पादने शेत जमिनीची उत्पादकता (Soil Productivity) आणि रोगप्रतिकारक लवचिकता वाढवते. ही विशेष उत्पादने भारतीय फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना पीक रोगांचे (Diseases Of Fruit And Vegetable Crops) प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी, पिकाचे व उत्पादनाचे नुकसान टाळण्यासाठी आणि इच्छित गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी मदत करते.
वेल्झो बुरशीनाशक (Velzo Fungicide)
- वेल्झो बुरशीनाशक (Fungicides) द्राक्षे, टोमॅटो आणि बटाटा पिकांमध्ये वापरण्यासाठी नोंदणीकृत केलेले आहे.
- करपा (Anthracnose) आणि केवडा (Downey Mildew) यासारख्या रोगाला कारणीभूत बुरशीपासून हे उत्पादन संरक्षण प्रदान करते.
- झाडे निरोगी रीतीने वाढतात आणि अधिक उत्पादनक्षम होतात.
- हे उत्पादन बुरशीजन्य रोगजनकांवर सर्वबाजूने मारा करून रोग प्रतिकार व्यवस्थापित करते.
- बुरशीजन्य रोगापासून दीर्घकाळ टिकणारे नियंत्रण आणि सातत्यपूर्ण परिणाम दाखवते त्यामुळे शेतकर्यांना उच्च प्रतिचे उत्पादन (Downey Mildew) मिळते.
- कमी खर्चात उच्च-गुणवत्तेचे उत्पादन मिळते.
कोसूट बुरशीनाशक (Cosuit Fungicide)
- कोसूट बुरशीनाशक (Fungicides) हे द्राक्षे, भात, टोमॅटो, मिरची आणि चहा यांसारख्या महत्त्वाच्या व्यावसायिक पिकांवरील बुरशीजन्य रोगांपासून प्रभावी संरक्षण देते.
- हे प्रगत फॉर्म्युलेशन उच्च जैविक तांबे सोडते, ज्यामुळे विस्तृत प्रमाणात आणि त्वरित रोग नियंत्रणास मदत होते.
- हे बुरशीनाशक बुरशीजन्य रोगांवर चांगले आणि दीर्घकाळ नियंत्रण देते आणि रोग प्रतिकारक (Disease Resistant) व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते.