Goat Pneumonia: शेळ्या-मेंढ्यांना होणारा घातक ‘न्यूमोनिया’ आजार; वेळीच करा प्रतिबंधक उपाय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: अनेक शेतकरी (Goat Pneumonia) आपल्या शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून शेळी- मेंढी पालन (Goat-Sheep Rearing) व्यवसाय करतात. त्यांना या व्यवसायांमधून चांगले उत्पादन सुद्धा ,मिळतात. मात्र वेगवेगळ्या ऋतुच्या साथीमुळे या शेळ्या मेंढ्यांना वेगवेगळे आजार होतात त्यामुळे उत्पादनाच्या बाबतीत पशुपालकांना (Animal Breeder) मोठे नुकसान झेलावे लागते.

हे नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी वेगवेगळ्या ऋतुमध्ये शेळ्याची आणि मेंढ्यांची काळजी घेण्याची गरज असते.

न्यूमोनिया (Pneumonia) किंवा फुफ्फुस दाह हा सर्व वयोगटातील मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार (Goat Diseases) आहे. यामुळे कित्येक पशुंचे बळी गेले आहेत शिवाय उत्पादनात घट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या, बोकड यांची वाढ सुद्धा पाहिजे तशी होत नाही. न्यूमोनिया आजारावर उपाय याविषयी शेतकर्‍यांना माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घेऊ या आजाराची लक्षणे आणि त्यावरील उपाय.

न्यूमोनियाची लक्षणे (Goat Pneumonia Symptoms)

  • शेळ्या – मेंढ्या एकाच जागेवर बसून राहतात.
  • डोळे लालसर दिसतात, डोळ्यातून, नाकातून चिकट स्त्राव येतो.
  • अधिक प्रमाणात ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतो किंवा जलद गतीने श्वास घेतात.
  • चरायला निघालेल्या कळपामध्ये लागण झालेली जनावरे मागे पडतात.

उपाय (Preventive Measures For Goat Pneumonia)

  • न्यूमोनिया (Pneumonia) हा संसर्गजन्य आजार आहे त्यामुळे अशा वेळी आजारी जनावर ओळखून लगेच वेगळी करा.
  • आजारी जनावरांना पशु वैद्यकांच्या मदतीने प्रतिजैवके देऊन त्वरित उपचार करावेत.
  • शेडमध्ये शेळ्या किंवा मेंढ्या योग्य प्रमाणात ठेवाव्यात. जेणेकरून अधिक प्रमाणात गर्दी होणार नाही. शेडमधील हवा खेळती राहील.
  • शेड नेहमी स्वच्छ ठेवावे, जेणेकरून जनावरांच्या मलमूत्रापासून अमोनियासारखा वायू तयार होणार नाही.
  • प्रतिकार शक्ती उत्तम राहण्यासाठी स्वच्छ पाणी व संतुलित आहार द्या.
  • वेळोवेळी जंतनाशक औषध (Deworming medicine) द्या जेणेकरून जंतांचा प्रादुर्भाव होणार नाही. सोबतच विविध आजारांच्या (Goat Pneumonia) विरुद्ध लसीकरण (Goat Vaccination) करून घ्या.
  • न्यूमोनियाने एखादे जनावर दगावला असल्यास त्याची योग्य विल्हेवाट लावावी. यासाठी जाळणे किंवा खोल खड्ड्यात पुरावे. या पद्धतींचा अवलंब केल्यास बाधित जीवाणू किंवा विषाणू इतर जनावरांमध्ये पसरणार नाही. अशा प्रकारे तुमची शेळ्या-मेंढ्यांचा जीव वाचवू शकतो.