Goat Rearing : शेळीपालन व्यवसायामध्ये खर्च कमी असतो आणि यामधून नफा देखील जास्त प्रमाणात राहतो. यामुळे अनेक शेतकरी शेळीपालन व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजची तरुण पिढी देखील नोकरी करण्यापेक्षा शेळीपालनाचा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांना शेळी पालन करण्यासाठी मदत करत आहे. वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून सरकार शेतकऱ्यांना शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान देखील देत आहे. त्यामुळे अनेक जण शेळीपालनाचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेळीपालनातून मोठे यश मिळवले आहे
सांगली जिल्ह्यातील शेतकरी तेजसलेंगरे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू करून या व्यवसायातून ते वर्षाला एक कोटी रुपयांच्या आसपास नफा कमवत आहेत. तेजस हे सांगली जिल्ह्यातील खानपुर तालुक्यातील असलेल्या बामणी या गावचे रहिवासी असून ते 2006 पासून ते शेळी पालन व्यवसाय करतात. त्यांच्याकडे सुरुवातीला कमी शेळी होत्या नंतर त्यांनी यामध्ये हळूहळू वाढ केली असून सध्या त्यांच्याकडे जास्त शेळी आहेत.
23 लाख खर्च करून शेळ्यांसाठी शेडची उभारणी
या शेतकऱ्याने 2013 मध्ये जवळपास 23 लाख रुपये खर्च करून शेळ्यांसाठी अत्याधुनिक शेडची उभारणी केली. या ठिकाणी शेडची उभारणी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट तयार केले असून त्यामध्ये वर्गवारीनुसार शेळ्या ठेवल्या जातात. त्यांनी कंपार्टमेंटची रचना अतिशय योग्य पद्धतीने केली आहे त्यांनी फळ्या ठोकून शेळ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे याचं कारण म्हणजे या फळ्यांवर ज्या शेळ्या राहतात त्यांचे मूत्र आणि लेंड्या या फळ्यांच्या मध्ये असलेल्या गॅपने खाली पडतात व त्यामुळे वरच्या फळांवर घाण न होता त्या ठिकाणी स्वच्छता देखील राहते
चारा व्यवस्थापन कसे केले?
शेळीपालन करताना चारा व्यवस्थापन देखील महत्त्वाचे असते याच गोष्टीचा विचार करून तेजस यांनी यांच्याकडे मेथी गवत, दशरथ घास तुती आणि हादगा गवताचा वापर ते शेळ्यांच्या चाऱ्यासाठी करतात त्यांनी शेळ्यांना टाकण्यासाठी गव्हाण तयार केले आहेत. त्याचबरोबर लहान करडांना चारा खाता यावा याकरिता मेथी घास किंवा दशरथ घासाची जोडी तयार केले जातात व त्या एका दोरीच्या साह्याने कंपार्टमेंटला बांधले जातात जेणेकरून करडांना व्यवस्थितपणे चारा खाता येतो.
शेळ्यांच्या लेंडीपासून बनवतात गांडूळ खत
आपल्याकडे अनेक जण दुग्ध व्यवसाय करतात यावेळी अनेक शेतकरी शेणापासून वेगवेगळे प्रयोग करून चांगले पैसे कमवत असतात. तसेच तेजस यांनी देखील शेळ्यांच्या लेंड्या पासून गांडूळ खत प्रकल्प देखील सुरू केला आहे. अठरा वर्षापासून ते गांडूळ खत आणि शेळीपालन व्यवसाय करत असून ते खूप चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत आणि सध्या चांगला पैसे देखील कमवत आहेत.