Chemical Contaminated Water: शेतकऱ्यांनो सावधान! रसायनयुक्त मळीचे पाणी शेतात वापरण्यापूर्वी जाणून घ्या होणारे नुकसान!  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: औद्योगिक वसाहतीमधील (Chemical Contaminated Water) किंवा साखर कारखान्यातील निघणारे मळीचे पाणी शेतीला फायदेशीर असल्याचे सांगत अनेकजण शेतकर्‍यांची फसवणूक करत आहेत. या गोष्टीला बळी पडून शेतकरी रसायनमिश्रित पाणी टँकरद्वारे शेतात टाकताना दिसून येतात (Use Of Contaminated Water In Agriculture Field). ते कुठल्या शेतात टाकावे, कुठल्या शेतात टाकू नये, यासाठी जमिनीचे माती परीक्षण झालेले नसते. या अज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

मुळात रसायनमिश्रित पाणी (Chemical Contaminated Water) कंपनीबाहेर घेऊन जाण्याची किंवा सोडून देण्याची परवानगी पर्यावरण खाते देत नाही. मात्र, सर्रास नियम मोडून मळीचे रसायनमिश्रित पाणी कुठेही सोडून देण्यात येत आहे. याला आळा घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

हे पाणी (Chemical Contaminated Water) नष्ट करणे किंवा त्यापासून पोटॅश निर्मिती करणे एवढे दोनच खर्चिक पर्याय साखर कारखाने (Sugar Factory) व डिस्टलरी उत्पादित कंपनीकडे (Distillery Manufacturing Company) असतात. एमआयडीसीमधून निघणारे सांडपाणी ट्रिटमेंट (Waste Water Treatment) करण्यासाठी कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये ईटीपी प्लांटची उभारणी करण्यात आलेली नाही.

राज्यातील इतर बऱ्याच औद्योगिक वसाहतींमध्ये सीईटीपी प्लांटची उभारणी केलेली असल्याचे तज्ज्ञ सांगत असून, टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये याची उभारणी केलेली दिसत नाही.

औद्योगिक वसाहतीमधील दूषित रासायनिक पाण्यावर (Chemical Contaminated Water) प्रक्रिया करण्याचा प्लांट प्रत्येक कंपनीत आहे. मग हे रासायनिक मळीमिश्रित पाणी कारखान्यातून बाहेर येतेच कसे? हा संशोधनाचा विषय झाला असल्याचे पर्यावरण अधिकारी सांगतात.

रसायनयुक्त मळीच्या पाण्यामुळे होणारे नुकसान (Hazards Of Contaminated Water)

  • हे सांडपाणी आजूबाजूचे जलस्रोत व पाळीव प्राणी यांना नुकसानकारक ठरत आहे.
  • रसायनमिश्रित पाण्यात सीओडी व बीओडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जमिनीत हे पाणी सोडल्यास जमीन नापीक होऊ शकते.
  • बोअर तसेच विहीरीमध्ये मिसळल्यास पाणी पिण्यायोग्य राहत नाही.
  • मुरमाड किंवा क्षारयुक्त जमिनीचा सामू (PH) 7 असल्यास मळीचे एकदाच पाणी सोडल्यास उपयुक्त ठरू शकते. मात्र काळ्या कसदार जमिनीत वारंवार सोडल्यास अशा जमिनी नापीक होऊ शकतात.
  • रसायनयुक्त मळीच्या पाण्यात क्लोराइड, सल्फेट, कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्फेट ही घातक रसायने या पाण्यात असतात, यामुळे कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात.
  • या पाण्यामुळे गर्भधारणेला अडचण निर्माण होऊन जनावरांना धोका निर्माण होऊ शकतो.