हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात (Herbicide Price) वेळेवर झालेल्या मॉन्सूनच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून खरीप हंगामाची (Kharif Season) जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच वेगवेगळ्या कृषी निविष्ठांच्या (Agriculture Inputs) वाढत्या किमतीमुळे या खरीप हंगामात शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. खतांच्या वाढलेल्या किमतीनंतर आता शेतकर्यांना तणनाशकाच्या किमतीत (Herbicide Price) झालेली वाढ याचा सुद्धा सामना करावा लागणार आहे.
यंदा भारतीय हवामान विभागाने (IMD) चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्यांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे पीककर्जापासून तर बियाणे, खते आणि औषधे खरेदीपर्यंतच्या तयारीला शेतकरी वेग देत आहेत.
एकीकडे शेतकर्यांमध्ये उत्साह असला तर यंदा अनेक कृषी निविष्ठांचे दर (Herbicide Price) वाढले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचा पेरणीचा खर्चही (Agriculture Production Cost) वाढणार असल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी जाणवत आहे. बियाणे, खताप्रमाणेच किटकनाशके आणि तणनाशके या निविष्ठा महत्त्वाच्या आणि आवश्यक मानल्या जातात. मजूर टंचाईमुळे अलीकडच्या काळात शेतकरी तणनाशकांना पसंती देत आहेत. मात्र यंदा तणनाशकांच्या (herbicide prices) किमती वाढल्या आहेत.
तणनाशकांचे आधीचे आणि आताचे दर (Herbicide Price) (प्रति लिटर)
ग्लायसिल: 350 – 450
परसूट: 1100 – 1350
सरगा सुपर: 1350 – 1400
साकेत: 800 – 850
शेतात तण अधिक प्रमाणात वाढल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर होतो. यामुळे सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे तणाचा वेळीच बंदोबस्त करणे अत्यावश्यक असते. असे असताना खत, बियाणे, शेती उपयोगी अवजारांचे दर वाढण्यासह तणनाशकाचे दरही (Herbicide Price) वाढविण्यात आल्याने पिकांचे संरक्षण नेमके कसे करायचे, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
तुरीच्या बियाण्यांचे दरही वधारले खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यासोबतच तुरीची विक्रमी क्षेत्रावर लागवड केली जात आहे. यंदा तुरीच्या बियाण्यांचे दर चांगलेच वधारले असून शेतकर्यांना जाणवणाऱ्या आर्थिक अडचणीत अधिकच भर पडली आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकर्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट विस्कळीत झाल्याचे बोलले जात आहे.