Hingoli Market Haldi Bhav: हिंगोली मार्केट यार्डात वधारले हळदीचे भाव! जाणून घ्या हरभरा आणि सोयाबीनचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हिंगोली बाजार समितीत हळदीचे भाव (Hingoli Market Haldi Bhav) गेल्या आठवड्यापेक्षा वाढले आहेत.बाजार समितीच्या (Bajar Samiti) मार्केट यार्डात सोमवारी तीन हजार क्विंटल हळदीची आवक झाली. या हळदीला सरासरी 16 हजार 400 रूपयांचा भाव (Turmeric Rate)मिळाला. दरम्यान, गत आठवड्याच्या तुलनेत पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकर्‍यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला.

शहरातील संत नामदेव मार्केट यार्डात (Sant Namdeo Market Yard) सध्या मराठवाड्यासह विदर्भातून हळदीची (Turmeric) विक्रमी आवक होत आहे. शनिवार आणि रविवारी बीट बंद ठेवण्यात येत असल्याने सोमवारी आवक वाढत असून, आदल्या दिवशीपासून शेतकरी हळद (Hingoli Market Haldi Bhav) घेऊन दाखल होत आहेत.

त्यामुळे मार्केट यार्ड आवारासह रेल्वे स्टेशन रोडवर वाहनांची रांग लागत आहे. आवक वाढल्याने एका दिवसात मोजमाप करणे शक्य होत नसल्याने शेतकर्‍यांना एक ते दोन दिवस मुक्कामी राहण्याची वेळ येत आहे.

27 मे रोजी 2 हजार 825 क्विंटल हळदीची आवक झाली होती. 15 हजार 300 ते 17 हजार 500 रुपयांदरम्यान भाव मिळाला. तर सरासरी 16 हजार 400 रुपये भाव मिळाला. (Hingoli Market Haldi Bhav)

हरभर्‍याच्या दरात सुधारणा  

जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन (Gram Production) चांगले झाल्याने मोंढ्यात सरासरी 300 ते 500 क्विंटलपर्यंत आवक होत आहे. यंदा भावही समाधानकारक असून, 6 हजार 300 ते 6 हजार 700 रुपयांदरम्यान भाव (Harbhara Rate)मिळत आहे. गत आठवड्याच्या तुलनेत सोमवारी सरासरी पाचशे रुपयांनी भाव वधारल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोयाबीनची 800 क्विंटल आवक

येथील मोंढ्यात सोमवारी 833 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. किमान 4 हजार 90 ते कमाल 4 हजार 477 रुपयांदरम्यान भाव (Soybean Bajar Bhav) मिळाला. यंदा सोयाबीनचे (Soybean) भाव कायम पडते असल्याने शेतकर्‍यांची निराशा होत आहे. तर गत आठवड्यात सरासरी 5 हजार 580 रूपयांचा भाव मिळाला होता. जवळपास पाचशे रुपयांनी भाव वधारल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.