हॅलो कृषी ऑनलाईन: कालच कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली अशी बातमी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतक-यांना नुकसान सोसावे लागले, शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना (Cotton And Soybean Farmers) दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येत आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक कसे करायचे याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस (Kapus Soybean Farmers Beneficiary Status)
- कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे स्टेट्स (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) ऑनलाईन चेक करण्यासाठी खालील सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट लिंकवर क्लिक करून ओपन करा.
- https://scagridbt.mahait.org/
- सोयाबीन कापूस अनुदान वेबसाईट ओपन केल्यानंतर “Disbursement Status” वर क्लिक करा.
- पुढे Disbursement Status पेज मध्ये आधार नंबर व कॅप्चा कोड टाकून Get Aadhaar OTP वर क्लिक करा.
- त्यानंतर कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याचे (Kapus Soybean Farmers Beneficiary Status) स्टेट्स विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळेल.