हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana Update) पात्र महिलांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यापासून म्हणजेच 14 ऑगस्टच्या सायंकाळपासून पात्र महिलांच्या खात्यावर रुपये जमा केले जात असून आत्तापर्यंत जवळपास 90 लाखाहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे (Ladki Bahin Yojana Update).
परंतु काही कारणास्तव बऱ्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याचे आढळले आहे, यामागे बँक अकाऊंट आधारला लिंक (Aadhar Link Bank Account) नसल्याचे कारण आहे. यासाठी घरबसल्या मोबाईल वरून सुद्धा अकाऊंट आधारला लिंक करण्याचे काम करू शकता (Ladki Bahin Yojana Update). जाणून घेऊ याविषयी.
बँक अकाउंट आधारला लिंक आहे की नाही कसे चेक करणार? (Ladki Bahin Yojana Update)
- तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्यायची आहे.
- यानंतर तुम्हाला माय आधार या पर्यायावर जायचे आहे.
- मग तुम्हाला लॉगिन करावे लागणार आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि कॅपच्या कोड टाकायचा आहे.
- यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी दिलेला रकान्यात भरायचा आहे.
- यानंतर तुम्हाला Bank seeding status या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँकेचे नाव, तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.
- जर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसले तर समजून जा की तुमचे बँक आधारसोबत लिंक आहे.
बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसल्यास काय करावे?
बँक अकाउंट आधार सोबत लिंक नसल्यास तुम्ही NPCI या संकेतस्थळावर भेट देऊन बँक अकाउंट आधार सोबत लिंक करू शकता. यासाठी
- एनपीसीआयच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर consumer या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
- नंतर भारत आधार सीडींग या ऑप्शन वर जायचे आहे. मग तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे अन Request For Aadhar Seeding या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला ज्या बँकेचे खाते लिंक करायचे आहे, त्या बँकेचे नाव निवडायचे आहे आणि खाली fresh seeding वर क्लिक करावे लागणार आहे.
- मग तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे.
- टर्म्स अँड कंडिशन्स स्वीकारायचे आहे.
- मग कॅपचा कोड भरून हा अर्ज सबमिट करायचा आहे.
अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या बँक खात्यासोबत तुमचे आधार कार्ड लिंक करू शकता (Ladki Bahin Yojana Update).