हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या अजून तरी मॉन्सूनने संपूर्ण राज्य (Maharashtra Rain Update) जरी व्यापले नसले तरी, 21 जुलै गुरूपौर्णिमेपर्यंत संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता (Monsoon Prediction) निवृत्त हवामानशास्त्रज्ञ (Meteorologist) माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या शेवटच्या टप्प्यातील पेरण्या (Kharif Sowing) शेतकर्यांनी आटपून घ्यायला पाहिजेत असाही सल्ला त्यांनी दिलेला आहे.
पावसाची हजेरी
गेली चार दिवस 14 ते 17 जुलै दरम्यान, धुळे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर वगळता कोकण, सह्याद्रीच्या घाटमाथ्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली (Maharashtra Rain Update).
आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे रविवार दि. 21 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत मुंबईसह कोकण व विदर्भातील अठरा जिल्ह्यात जोरदार तर संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता जाणवते (Maharashtra Rain Update).
पावसासाठी पूरक गोष्टी
- दिड किमी उंचीचा मॉन्सून ट्रफ दक्षिणेकडे झुकला
- अरबी समुद्रातील ऑफ शोर ट्रफ (Off Shore in Arabian Sea)
- 900 मीटरवर सौराष्ट्र व कच्छवर चक्री वाऱ्याची स्थिती (Cyclone Condition)
- 3100 मीटरच्या वर साडेचार किमी जाडीतील नाशिक ते वाशिम, गडचिरोली वरून जाणारा शिअर झोन
- शुक्रवार 19 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र तयार होणार आहे.
जोरदार व सलग पावसाचा अभाव का?
अजूनही राज्यात मॉन्सूनची सक्रियता पाहिजे त्या प्रमाणात झालेली नाही (Maharashtra Rain Update). अधिक सक्रिय, बळकट व अधिक काळ सतत पडणारा झडीचा पाऊस कोकण व विदर्भ, वगळता महाराष्ट्रात अजूनही पडलेला नाही. परंतु सद्यस्थितीतील वरील तयार होणारी अनुकूल परिस्थिती बघता लवकरच संपूर्ण राज्यात मॉन्सून बरसेल असे वाटते.
धरण जलसाठ्याची अवस्था? (Dam Water Storage Condition)
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या 4 जिल्ह्यांच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर 640 किमी. लांबी व पूर्व-पश्चिम 10 ते 20 किमी. रुंदीच्या नद्या उगम व धरण पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर घोटी, इगतपुरी, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, ताम्हिणी, वेल्हे, भोर, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, बावडा, राधानगरी इ. घाटमाथ्यावरील पट्ट्यात मॉन्सूनची कामगिरी (Maharashtra Rain Update) सध्या उत्तम होत आहे. शिवाय सध्याच्या वातावरणीय प्रणाल्याही पूरक जाणवतात. त्यामुळे जुलै अखेर, कदाचित जलसंवर्धनातून धरण साठ्याची टक्केवारीही कमीतकमी 70% पर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेवटच्या टप्प्यातील शिल्लक पेरण्या?
ज्या शेतकर्यांच्या चांगल्या ओली अभावी खोळंबलेल्या पेरण्या ह्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता जाणवते. खरीप पेरीचा हा शेवटचा टप्पा समजावा.