हॅलो कृषी ऑनलाईन: महिंद्राने भात शेतीसाठी (Mahindra 6RO Paddy Walker Transplanter) उपयुक्त शक्तिशाली आणि कार्यक्षम इंजिन असलेले अत्याधुनिक 6RO पॅडी वॉकर ट्रान्सप्लांटर दिल्लीत नुकतेच लाँच (Launched In Delhi) केले आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि. (Mahindra & Mahindra Ltd) च्या फार्म इक्विपमेंट सेक्टर (FES), महिंद्रा ग्रुपचा एक भाग असलेल्या जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने (Tractor Manufacturer Company) दिल्लीत महिंद्रा 6RO पॅडी वॉकर नावाचे नवीन 6-रो पॅडी ट्रान्सप्लांटर (Mahindra 6RO Paddy Walker Transplanter) लाँच केले आहे. दिल्लीत 4RO वॉक-बॅक ट्रान्सप्लांटर (MP461) आणि 4RO राइड-ऑन (प्लांटिंग मास्टर पॅडी 4RO) च्या यशस्वी लाँचनंतर, अगोदरच बाजारात प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा कंपनीला नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकर भात रोपण तंत्रज्ञानद्वारे (Mahindra 6RO Paddy Walker Transplanter) बाजारात नेतृत्व करता येईल.
तांदूळ (Paddy Crop) हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. जागतिक दर्जाच्या तांदळासाठी आणि तांदूळ यांत्रिकीकरण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात दिल्ली आघाडीवर आहे. उच्च दर्जाचे तांदूळ राज्याच्या अनेक भागांमध्ये घेतले जाते. या नवीन तंत्रज्ञानामुळे पाणी आणि श्रम यांच्या बचत, पर्यावरणाचे संरक्षण, आणि कमी खर्चात भातशेतीतून (Rice Farming) जास्त नफा मिळवता येईल.
6RO पॅडी वॉकर ट्रान्सप्लांटरची वैशिष्ट्ये (Mahindra 6RO Paddy Walker Transplanter Features)
- नवीन महिंद्रा 6RO पॅडी वॉकर मध्ये उत्कृष्ट ऑपरेटर कार्यक्षमता आहे.
- मॅन्युअली ऑपरेट होत असलेले हे नवीन ट्रान्सप्लांटर कॉम्पॅक्ट तर आहेच शिवाय एका पासमध्ये एकाच वेळी सहा ओळींमध्ये एकसमान रोपांची पुनर्लागवड करता येते.
- या पॅडी वॉकरला मर्यादित जागा लागत असून हाताळायला सोपे आहे.
- या पॅडी ट्रान्सप्लांटरमध्ये 4 लिटर क्षमतेसह अत्यंत टिकाऊ गिअरबॉक्स आणि शक्तिशाली इंजिन आहे.
- हे उच्च उत्पादन आणि कमी इंधनाच्या वापराची हमी देते,
- भातशेतीमध्ये उत्पादकता वाढवते.
या ट्रान्सप्लांटरचा 2-वर्षांचा परतावा कालावधी असून किमान ऑपरेटिंग क्षेत्र केवळ 200 एकर असणार्या या ट्रान्सप्लांटरला नवीन भात बागायतदार इतर शेतकर्यांना भाड्याने सुद्धा देऊ शकतात. यामुळे त्यांना नवीन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
महिंद्राच्या विस्तृत फार्म मशिनरी डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध, दिल्लीचे शेतकरी त्वरित घरोघरी सेवेचा लाभ घेऊ शकतात ज्याचे ‘महिंद्रा साथी’ (Mahindra Sathi) नावाच्या नवीन वापरकर्ता-मित्र ॲपद्वारे परीक्षण केले जाऊ शकते.