Mango Fertilizer Dose: आंबा फळझाडांना वयानुसार एवढ्या प्रमाणात द्या संतुलित खत मात्रा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा (Mango Fertilizer Dose) कलम जोमाने वाढण्यासाठी व भरपूर फळे येण्यासाठी दरवर्षी कलमाच्या वयोमानानुसार खते देणे आवश्यक आहे. लागवडीनंतर पहिल्या वर्षापासून तर पूर्ण वाढलेल्या आंब्याच्या झाडास (Mango Tree) किती प्रमाणात आणि कोणती खते (Mango Fertilizer Dose) द्यावीत, जाणून घेऊ या सविस्तर.

आंबा खत व्यवस्थापन (Mango Fertilizer Dose)

  • सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात शिफारस केलेली (Recommended Fertilizer Dose) संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फूरद व पालाशची मात्रा द्यावी व नत्राची मात्रा एक किंवा दोन हप्त्यात विभागून द्यावी.
  • खताची मात्रा देताना बांगडी पद्धतीने (Ring Method Of Fertilizer Application) द्यावीत. मध्यान्ही झाडाची सावली जेवढ्या भागावर पडेल त्या क्षेत्राच्या मधोमध 1 ते 1.5 मीटर दूर, 15 से. मी. खोल आणि 30 ते 45 से.मी. रूंद चर घेऊन गोलाकार पद्धतीने द्यावीत.
  • प्रथम चरात पालापाचोळा व शेणखत (Manure Application) टाकून नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी सारखी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.
  • पहिल्या वर्षी 300 ग्रॅम युरिया + 300 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश दयावे.
  • कलमाचे वय वाढत जाईल तसे हे प्रमाण प्रतिवर्षी 1 घमेले शेणखत + 300 ग्रॅम युरिया + 300 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट + 200 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या प्रमाणात वाढवावे.
  • पूर्ण वाढलेल्या आंब्याच्या झाडास (Full Grown Mango Tree Fertilization) 50 किलो शेणखत/कंपोस्ट , दीड किलो नत्र, अर्धा किलो स्फूरद व अर्धा किलो पालाश प्रती झाड जून- जुलै महिन्यात व नत्र दोन समान हप्त्यात द्यावे. म्हणजेच 3 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दयावे. युरिया विभागून द्यावा (Mango Fertilizer Dose).